हेमंत साेरेन ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

झारखंडचे मुख्‍यमंत्री साेरेन यांची ‘ईडी’ अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

नंदू लटके
पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांची सक्‍तवसुली संचालनालयाचे ( 'ईडी' ) अधिकारी जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करत आहेत. दरम्‍यान, आज (दि.३१) सोरेन यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करत 'ईडी' अधिका-यांविरुद्ध रांची पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे. ( Hemant Soren files police complaint against ED officials)
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 'ईडी' अधिकाऱ्यांनी बुधवारी सोरेन यांची रांची येथील त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली.१० दिवसांत हेमंत सोरेन यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २० जानेवारी रोजी या प्रकरणासंदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली होती. ( Hemant Soren files police complaint against ED officials)

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रांचीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती.'ईडी' अधिकाऱ्यांनी सोमवारी दिल्लीतील त्याच्या घरी शोध मोहिमेदरम्यान 36 लाख रुपये, एक एसयूव्ही आणि कागदपत्रे जप्त केली होती. आता सोरेन यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करत 'ईडी' अधिका-यांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. दिल्‍ली येथील निवासस्‍थानाची झडती घेतल्‍याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

ईडी हेमंत सोरेन यांची चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्‍कराच्‍या मालकीच्‍या ४.५५ एकर जमिनीच्‍या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना 14 ऑगस्ट 2023 रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर 20 जानेवारीला आठव्‍या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे. यामध्‍ये २०११ बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.
या प्रकरणी 13 एप्रिल रोजी ईडीने झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधील सुमारे 22 ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यात झारखंड कॅडर आयएएस छवी रंजन यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. रंजन हे यापूर्वी रांचीचे उपायुक्तही राहिले आहेत.मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार ईडीने ही कारवाई केली होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT