बारपेटा (आसाम) : आसाममध्ये अशी अनेक घरे पुराच्या पाण्याखाली बुडाली आहेत. 
Latest

Heavy Rain In Madhya Pradesh And Assam : यूपी, आसामात पावसाचा कहर; ५ बळी, १३६६ गावे पाण्याखाली

अमृता चौगुले

नवी दिल्ली / गुवाहाटी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशात (Madhya Pradesh) पावसामुळे गेल्या 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कानपूर, घाटमपूर, कन्नौज, बिधानू आणि औरैया येथे या घटना घडल्या आहेत. बिपरजॉयमुळे अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. (Heavy Rain In Madhya Pradesh And Assam)

उत्तर प्रदेशातील 36 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात 26 जूनपर्यंत अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. (Heavy Rain In Madhya Pradesh And Assam)

आसाममध्ये (Assam) पूरस्थिती (Flood situation) असून, 5 लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. 1366 गावे पाण्यात बुडाली. पुरामुळे 14 हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.

आसाममध्ये बजली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, बोंगाईगाव, चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, गोलाघाटसह 22 जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.

राजस्थान, ओडिशा, उत्तराखंडसह बहुतांश उत्तर भारतात जोरदार पाऊस झाला असून, आसाम, मेघालय, सिक्किम या इशान्येकडील राज्यांत पुढील 5 दिवस संततधार पाऊस असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

पूर्वेकडील बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवस देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात 25, 26 रोजी पाऊस

कोकण आणि गोव्यात 23 जूनपासून सुरू झालेला पाऊस 26 जूनपर्यंत सुरू राहू शकतो. 25 आणि 26 जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT