Healthy love life  
Latest

Healthy love life : ताजेतवाने राहण्याची गुरुकिल्ली

Arun Patil

नवी दिल्ली : निरोगी जीवनासाठी जीवनाच्या प्रत्येक पैलूकडे समान लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ शरीराची निगा, त्वचेची निगा आणि केसांची निगा राखून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकत नाही. तुमच्या लव्ह लाईफसाठी (Healthy love life) हेल्दी असणेही खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला इंटरनेटवर अनेक उपाय सापडतील, जे तुमच्या आयुष्यात रोमान्स भरण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तथापि, प्रणय ही एक भावना आहे आणि ती सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात छोटे बदल करावे लागतील. हल्ली प्रेमासाठी वेळ काढणे हेदेखील आव्हान आहे. त्याकरिता आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे महत्त्वाचे आहे. याचे गमक लपले आहे तुमच्या आहारात आहे. तुमचा आहार असा असला पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला सतत ताजेतवाने वाटत राहील.

डॉर्क चॉकलेट : मेंदूमध्ये आढळणारे सेरोटोनिन नावाचे रसायन वाढवण्याची क्षमता डार्क चॉकलेटमध्ये असते. हे रसायन तणाव पातळी देखील कमी करते. साहजिकच, जेव्हा तुमची तणावाची पातळी कमी असेल तेव्हा फील-गुड हार्मोन्सदेखील (Healthy love life) वाढतील आणि यामुळे तुम्हाला आणखी रोमँटिक वाटेल. डार्क चॉकलेटचे मर्यादित सेवन केल्याने तुम्हाला झोप आणि भूक चांगली लागते. तुमचा मूडही चांगला राहतो.

खजूर : पाण्यात भिजवलेले दोन 2 खजूर खाल्ले तर तुम्हाला नक्कीच ताजेतवाने (Healthy love life) वाटेल. गरम दुधासोबत 2 खजूरही खाऊ शकता. खजुरामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात; मात्र तुम्ही जास्त खजूर खाल्ले तर तुमचे वजनही वाढू शकते. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणातच सेवन केली पाहिजे.

डाळिंब : हे खूप लाभदायी फळ आहे. हे केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर तुमचे प्रेमजीवन (Healthy love life) आनंदी बनवते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्याची क्षमताही डाळिंबात असते.

आले : आल्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे (Healthy love life) निर्मिती वाढते. आल्याचे नियमित सेवन करणे नेहमीच उत्तम ठरते, असे आहारतज्ज्ञांकडून सांगितले जाते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT