Latest

Health Tips : सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या, शरीरासाठी ‘हे’ आहेत फायदे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन :  भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Health Tips) ठरते. पुरेसे पाणी पिल्याने अनेक प्रकारचे आजारांना प्रतिबंध करता येतो आणि शरीर निरोगी राहते. काहीवेळा असेही म्हटले जाते की, थंड पाण्यापेक्षा गरम पाणी हे नेहमीच आरोग्यदायी असते. या कारणास्तव अनेक लोक अनेकदा गरम पाणी पिणे पसंत करतात. ज्यांचे वजन जास्त आहे ते देखील कोमट पाणी पिऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. घसादुखी, सर्दी-खोकला, सर्दीमध्येही लोक गरम पाणी पितात.

पण तज्ज्ञांच्या मते, थंड आणि गरम पाणी पिण्यापेक्षा सामान्य कोमट पाणी पिणे (Health Tips)  अधिक प्रभावी ठरू शकते. बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास अनेकवेळा लोक सकाळी सकाळी कोमट पाणी पितात, पण जास्त गरम पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कोमट पाणी आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर. चला जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे आरोग्यावर काय सकारात्मक परिणाम होतात.

Health Tips : कोमट पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो : कोमट पाणी पिल्याने आतड्यांसंबंधीचा त्रास कमी होतो आणि पोट साफ होते. अपचन आणि आम्लपित्त झाल्यास कोमट पाणी घेऊ शकता. यामुळे अन्न खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेची तक्रार होत नाही आणि पोटदुखी कमी होते.

वजन कमी होते : कोमट पाणी अन्न पचनासाठी गुणकारी आहे. सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर हलके कोमट पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. आरोग्याच्या फायद्यांसोबतच मन देखील शांत राहते आणि प्रमाणात भूक लागते.

पचनप्रक्रिया सुधारते : पचनशक्ती सुधारण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. सौम्य कोमट पाणी पोट आणि आतडे हायड्रेट करण्यास मदत करते. अशावेळी तुम्ही कोमट पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करू शकता.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात : चेहऱ्यावरील सुरकुत्या तुम्हाला त्रास देऊ लागल्या असतील तर काळजी करण्यासारखे काही नाही, आजपासून कोमट पाणी प्यायला सुरुवात करा आणि काही आठवड्यांत त्याचा परिणाम पहा. तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या जाऊन ती चमकदार होते.

शरीरातील रक्ताभिसरण सुधारते : शरीर सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण शरीरात योग्य रक्ताभिसरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थितरित्या होण्यासाठी कोमट पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.

याचबरोबर कोमट पाणी पिल्याने छातीत अडकलेला कफ मोकळा होतो, भूक कमी लागण्याची समस्या दूर होते, केस लवकर पांढरे होत नाहीत, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्वचा लवचिक होण्यासही मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT