Latest

Layoffs : आता हेल्थ टेक कंपन्यांतही नोकरकपात, फिलिप्सकडून ६ हजार जणांना नारळ!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : डच हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनी फिलिप्स (Dutch health technology company Philips) आता दुसऱ्या टप्प्यात ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. याआधी कंपनीने पहिल्या टप्प्यात गेल्या ऑक्टोबरमध्ये ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले होते. फिलिप्स कंपनीकडून सोमवारी सांगण्यात आले आहे की त्यांची श्वसनाशी संबंधित उपकरणे बाजारातून परत मागवल्यानंतर कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. यामुळे नफा वाढविण्याचा कंपनीचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने जागतिक स्तरावरील ६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी (Layoffs) केले जाणार आहे.

यातील निम्म्या कर्मचाऱ्यांना या वर्षी कामावरून कमी जाईल. तर उर्वरित कर्मचाऱ्यांना २०२५ पूर्वी सेवेतून मुक्त जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात ओल आहे. याआधी कंपनीतून ४ हजार जणांना काढून टाकण्यात आले होते. ही कर्मचारी कपात एकूण मनुष्यबळाच्या ५ टक्के होती.

स्लीप एपनियावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी लाखो व्हेंटिलेटर कंपनीने परत मागवली आहेत. "कंपनी संशोधन आणि विकास क्षेत्रात ९ टक्के गुंतवणूक करणे सुरू ठेवेल, पण कंपनी अधिक परिणामकारक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करेल", असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉय जॅकोब्स यांनी म्हटले आहे. अॅमस्टरडॅम येथे कंपनीचे मुख्यालय आहे.

जगभरात नोकरकपातीची (Layoffs) लाट सुरु आहे. नुकतीच जर्मन सॉफ्टवेअर कंपनी SAP ने सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची योजना आखली असल्याचे वृत्त समोर आले होते. या नोकरकपातीचा SAP मधील २.५ टक्के कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. नुकतीच IBM या तंत्रज्ञान कंपनीने ३,९०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. आता त्यापाठोपाठ जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपातीचा सपाटा लावला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT