Ranveer Singh  
Latest

HBD Ranveer Singh : बॅकबेंचर रणवीर बालपणी होता गोलुमोलू, फिटनेससाठी काय केलं पाहा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टॉपच्या फिट अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंह (HBD Ranveer Singh) चा समावेश होतो. सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज करणारा रणवीर सिंहने दीर्घकाळ प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वी ठरला आहे. 'दिल धडकने दो' मध्ये त्याच्या चॉकलेट बॉय लूक असो वा मग 'पद्मावत'मध्ये मस्कुलर लूक, रणवीर (HBD Ranveer Singh) प्रत्येक भूमिकेत स्वत:ला फिट बसवतो.

यासाठी रणवीर जीवतोड मोहनत घेतो. फिटनेससाठी तो इतका सतर्क राहतो की, त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायची इच्छा असते की, रणवीर आपला फिटनेस ठेवतो तरी कसा? अखेर फिट बॉडीसाठी रणवीर सिंह काय काय खातो आणि कोणते वर्कआऊट करतो?

रणवीर आपले वर्कआउट सेशन कधी मिस करत नाही. मीडिया रिपोर्टनुसार, तो दारु पित नाही. तो रनिंग आणि स्वीमिंगदेखील करतो.
रणवीरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो फिटनेसबद्दल ऋतिक रोशनला आपला रोल मॉडल मानतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिटनेसमध्ये सर्वात महत्त्वाचं डाएट येतं. हेल्दी घरचे जेवण खाणे तो पसंत करतो. जंक फूडपासून दूर राहतो.

रणवीरने नेहमी हाय प्रोटीन आणि कमी कार्ब असणाऱ्या अन्न पदार्थावर फोकस केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिकन आणि सालमन फिश त्याचे आवडते जेवण आहे. रणवीर प्रोटीन शेकदेखील पितो.

नाश्तामध्ये एक के‍ळ आणि एग व्हाईटचे ऑम्लेट खातो.

दुपार आणि रात्रीच्या जेवणात रणवीर काही भाज्यांसोबत चिकन वा फिश खातो.्‌  स्नॅक्समध्ये ड्राय फ्रूट्स आणि प्रोटीन शेक घेतो.

रणवीर भात, मैदा, ब्रेड, नूडल्स, पास्ता खात नाही. जिथे जिम जाणे शक्य होत नाही, तिथे तो पुशअप्स आणि सुटकेस उचलून व्यायाम करू लागतो. पण, जेवल्यानंतर तो काही ना काही गोड खातो.

बालपणी रणवीर दिसायला जाडजूड होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

फिट राहण्यासाठी योग्य आहार, पूर्ण झोप आणि जबरदस्त मेहनत हा रणवीरचा फिटनेस मंत्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT