Latest

मैत्रीचा अर्थ स्त्री शरीरसुखासाठी उपलब्ध आहे, असे नाही : कोर्ट

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क

"मैत्रिण आहे, याचा अर्थ ती तुमची वासना शमवण्यासाठी आहे, असं होत नाही," असे मुंबईतील एका न्यायालयाने म्हटले आहे. १८ वर्षांच्या एका तरुणाने १३ वर्षांच्या मैत्रिणीवर बलात्कार केला होता. या केसच्या सुनावणी वेळी कोर्टाने ही टिप्पणी केली आहे. या प्रकरणात संबंधित तरुणाला ८ वर्षांची सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संबंधित तरुणावर आयपीसी कलम 376 कलम 354D आणि Protection of Children from Sexual Offences Act मधील तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रिती कुमार यांनी हा निकाल दिला आहे.

या तरुणाने मुलीसमवेतचे रंगपंचमी खेळतानाचे फोटो न्यायालयात सादर केले होते आणि आपले प्रेमसंबंध होते असा बचाव सादर केला होता. तसेच आपल्यातील प्रेमसंबंध मुलीच्या आईला माहिती होते, असेही म्हणणे मांडले होते.

पण न्यायालयाने बचाव फेटाळून लावला. "या प्रकरणातील आरोपीचं वय १८ वर्षं आहे. मित्र हे लैंगिक संबंधासाठी नसतात याची जाणीव त्याला आहे. मैत्री असणं याचा अर्थ इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवावे असे होत नाही," असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे.

मैत्रीचा अर्थ प्रेम असा घेऊ नये. विरुद्धी लिंगी व्यक्ती मित्र आहे, याचा अर्थ ती शरीर संबंधासाठी उपलब्ध आहे, असे होत नाही, असंही त्यांनी म्हटलेले आहे. या प्रकरणात आरोपीने पीडितेवर प्रेम करतो, असे सांगितलं होतो. हा प्रकार पीडितीने घरी येऊन आईला सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेवर घरात घुसून बलात्कार केला. पीडितेच्या आईने यावर पोलिसांत तक्रार दाखल केली.

न्यायालयाने पीडिता ही अल्पवयीन असल्याचा मुद्दाही विचारात घेतला आहे. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या संमतीचा असण्या किंवा नसण्याचा मुद्दा पूर्णपणे गैरलागू आहे, असे निरीक्षण नोंदवलेले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद |monkey dogs gangwar in beed

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT