नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी वयाची ८२ वर्षे पूर्ण करत ८३ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही माझी शुभकामना, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. तर शरद पवारांना शुभेच्छा देताना त्यांचे नेतृत्व हे प्रेरणास्थान आहे आणि मला त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यांना चांगले आरोग्य लाभो, अशा शब्दांत अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी एक्सद्वारे शुभेच्छा दिल्या. Sharad Pawar
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा