meera jasmine 
Latest

साऊथची मीरा जास्मिन कोण आहे? जिच्या फॅशनची सर्वांनाच भूरळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री मीरा जास्मिन मल्याळम फॅन्सची फेव्हरेट अभिनेत्री आहे. अभिनेत्री मीरा जास्मिन हिने इन्स्टाग्रामवर आपला आनंद फॅन्ससोबत शेअर केला आहे. मीरा सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. दरम्यान, मीरा सहा वर्षांनंतर मल्याळम इंडस्ट्रीमध्ये वापसी करत आहे. सत्यन एंथिक्कड द्वारा दिग्दर्शित नव्या चित्रपटात मीरा जयरामच्या नायिकेच्या भूमिकेत आहे.

आज तिचा १५ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का, मीराने साऊथ इंडस्ट्रीत पुष्कळ लोकप्रियता मिळवलीय. आता ती पुन्हा या क्षेत्रात परतणार म्हटल्यावर तिच्या फॅन्सना उत्सुकता लागून रहिलीय. 

संयुक्त अरब आमीरात गोल्डन व्हिसा तिने स्वीकारला आहे. मीरा म्हणाली, तिला हे ऐकून आनंद झालाय की, प्रेक्षकांमध्ये तिच्या वापसीवरून उत्साह आहेत.

शिवानी, प्रियामदवा, जेनी, कमला, शाहिना यासारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका मीराने साकारल्या आहेत. मीरा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. मीरा सोशल मीडियावरदेखील ॲक्टीव्ह आहे. ती फॅशनमुळेही ओळखली जाते. सोशल मीडियावरील तिचे इन्स्टाग्राम हँडल फॅशनिस्टांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे.

कॅमेऱ्याला सामोरे जात असतानाही, शक्य तितकी तिची साधी राहणीमान असते.

व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन

या सुंदर अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनच्या आधी संध्याकाळचा आनंद लुटतानाचा फोटो पोस्ट केला. लाल सॅटिन स्लिप ड्रेसमध्ये मीराने सर्वांचेच लक्ष वेधले. तिने कमीत कमी ज्वेलरी घातल्या आहेत. या पोशाखात ती अतिशय सुंदर दिसत होती. ही अभिनेत्री क्लासी लूकमध्ये खूप सुंदर दिसते. तिने मेकअप केला नसला तरी तिचा लुक लक्षवेधी ठरतो.

तिचं म्हणणं आहे की, काळे कपडे घालणाऱ्या महिलांचे जीवन रंगीत असते. अलिकडेच तिने फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती काळ्या रंगाच्या ब्रालेटमध्ये दिसते. काळी पँट आणि झिप डिटेल कोटसह तिने हे फोटोशूट केलं आहे. स्टायलिश दिसण्यासाठी तिने केलेली फॅशनदेखील तिची वेगळी ओळख निर्माण झालीय.

तिचा रोजचा पोशाखदेखील पाहिला तर ठळक दिसतो. दुबईमधील एका अनौपचारिक दिवसासाठी तिने स्ट्रीप केलेला हाय नेक टॉप निवडला होता. त्याला pleated डेनिम बॉटम वेअरसह जोडले होते. सोबत तिने ब्रेसलेट आणि घड्याळ वगळता इतर अॅक्सेसरीज घातलेल्या नव्हत्या. कॅज्युअल लूकमध्येही ती छान दिसत होती.

तिने अलिकडेच गुलाबी कॉर्सेट ट्यूल ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. (pink corset tulle dress) या फोटोशूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT