गाझामध्‍ये ओलीस ठेवण्‍यात आपलेल्‍या इस्‍त्रायच्‍या नागरिकांपैकी शेरॉन हर्टझमन यांची हमासने शनिवारी (दि.२५) सुटका केली. यानंतर शेबा मेडिकल सेंटरमध्ये आपली मुलगी नोमची भेट घेताना शेरॉन हर्टझमन. ( फाेटाे : पीटीआय) 
Latest

युद्धविराम कालावधी वाढवण्याचा ‘हमास’चा प्रयत्न

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हमासने सुमारे ५० इस्‍त्रायलच्‍या ओलीस नागरिकांची सुटका करणे आणि इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी या वाटाघाटी सुरु तात्‍पुरत्‍या युद्धविरामची घोषणा केली होती. आता पॅलेस्टिनी बंदिवानांची सुटकेसाठी गंभीरपणे प्रयत्नासाठी इस्रायलशी आणखी चार दिवसांचा युद्धविराम वाढवण्याचा प्रयत्‍न हमासने सुरु केले आहेत, असे वृत्त वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. ( Hamas seeks to extend truce with Israel )

गाझामधील मानवतावादी मदतीच्या बदल्यात इस्रायल आणि हमास यांच्यातील शत्रुत्व थांबवण्यासाठी कतार आणि इजिप्तने मध्यस्थी केलेल्या कराराचा भाग म्हणून हमासने आतापर्यंत ५८ बंदिवानांची सुटका केली आहे. शुक्रवारपासून हमासने ओलीस नागरिकांची सुटका केली आहे. युद्धविराम कराराचा एक भाग म्हणून आणखी १७ ओलिसांची सुटका केल्यानंतर, हमासने म्हटले आहे की, जर त्यांनी अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले तर ते इस्रायलशी युद्धविराम वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने चार दिवसांच्या तिसऱ्या दिवशी चार वर्षांच्या इस्रायली-अमेरिकन मुलीसह आणखी 17 ओलिसांची सुटका केल्यानंतर हमासने रविवारी (स्थानिक वेळेनुसार) इस्रायलशी चार दिवसांचा युद्धविराम वाढवायचा असल्याचे सांगितले. इस्रायलने अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यासाठी गंभीर प्रयत्न केल्यास युद्धविराम वाढविला जाऊ शकतो, असे हमासने एका निवेदनात म्हटले आहे.

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसच्या म्हणण्यानुसार, १७ ओलिसांपैकी १३ इस्रायली, तीन थाई आणि एक रशियन नागरिकाची हमासने गाझामधून इस्रायलला हस्तांतरित केले आहे. यामध्‍यरे अबीगेल एडन ही चार वर्षांची मुलीचा समावेश आहे. ७ ऑक्‍टोबर रोजी हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यात तिचे आई-वडील ठार झाले होते. त्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले होते. दरम्‍यान, इस्रायलने 39 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. त्‍यांचे वेस्ट बँकची राजधानीमध्‍ये भव्य स्वागत करण्यात आले.

'युद्धविराम संपल्यानंतर इस्रायल गाझामध्ये पुन्‍हा लष्करी मोहीम सुरु करणार'

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान इस्‍त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले होते की, तात्पुरती युद्धविराम संपल्यानंतर इस्रायल गाझामध्ये पूर्ण ताकदीने आपली लष्करी मोहीम पुन्हा सुरू करेल. मूळ कतारी-दलालीच्या करारानुसार मान्य केल्याप्रमाणे, दररोज दहा अतिरिक्त ओलीसांची सुटका करणे सुलभ झाल्यास युद्धविराम वाढविण्याचे ते स्वागत करतील, असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT