Latest

Gunaratna Sadavarte : ‘सिल्व्हर ओक’ हल्‍लाप्रकरण : सदावर्ते यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी, १०९ संशयितांना १४ दिवस न्‍यायालयीन काेठडी

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शरद पवारांच्‍या निवासस्‍थानावरील हल्‍लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना किला न्‍यायालयाने आज दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह  अटक केलेल्या १०९ संशयित आराेपींना आज  किल्ला कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील, सदावर्ते यांचे वकील आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अशी तिन्ही बाजूंनी किला कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्‍यायाधीशांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दाेन दिवसांची पाेलीस काेठडी दिली. तर याप्रकरणातील १०९ संशयित आराेपींना १४ दिवसांची न्‍यायालयीन काेठडी सुनावण्‍यात आली.

Gunaratna Sadavarte :सदावर्ते यांच्‍यावर गंभीर आराेप

सदावर्ते यांच्‍यावरील आराेप गंभीर आहेत. त्‍यांना १४ दिवसांची पाेलीस काेठडी द्‍या, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्‍यायालयात केली. शरद पवार यांच्‍या निवासस्‍थानासमाेर कर्मचार्‍यांना आंदाेलन करण्‍याची चिथावणी दिली, असेही त्‍यांनी सांगितले.  पवार यांच्‍या निवासस्‍थानावर झालेल्‍या हल्‍ल्‍यामागे एकटे सदावर्ते नाहीत. यामागे माेठे षड्‍यंत्र आहे. पाेलिसांवरही हल्‍ला करण्‍यात आला. या हल्‍ल्‍यामागे भाडाेत्री गुंड हाेते का, याची सखाेल चाैकशी हाेणे गरजेचे आहे. यासाठी सदावर्ते यांना १४ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्‍यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आंदोलन करणारे कर्मचारी गुंड प्रवृत्तीचे नाहीत, असे युक्तिवाद केला.

सरकारविराेधात भूमिका घेतलाने सदावर्तेंवर कारवाई

सदावर्ते हे विविध प्रश्‍नांवर सरकारविराेधात भूमिका घेतात. तसेच मराठा आरक्षणाविराेधात त्‍यांनी याचिका दाखल केल्‍याने  त्‍यांच्‍यावर जाणीवपूर्वक  कारवाई केली जात आहे, असा युक्‍तीवाद यावेळी सदावर्ते यांच्‍या वकिलांनी केला. मराठा आरक्षण प्रश्‍नी सदावर्ते यांनी घेतलेल्‍या भूमिकेमुळे यांच्‍यावर हल्‍ला झाला हाेता. एसटी कर्मचार्‍यांना न्‍याय देण्‍यासाठी ते कायदेशीर लढाई लढत आहेत. सदावर्ते यांनी कधीच चिथावणीखाेर भाषण केले नाही. जेव्‍हा हल्‍ला झाला तेव्‍हा ते न्‍यायालयात उपस्‍थित होते. नेहमीच शांततेच्‍या मार्गाने आंदाेलनाचे आवाहन त्‍यांनी केले. तसेच बारामतीत आंदाेलन करा, असे त्‍यांनी म्‍हटलं हाेते. घरात घुसून आंदाेलन करा, असे कधीच म्‍हटलं नाही, असेही सदावर्ते यांनी सांगितले.

१०९ संशयितांना १४ दिवसांची न्‍यायालयीन काेठडी

सदावर्ते यांचे वकील आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अशी तिन्ही बाजूंनी किला कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्‍यायाधीशांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते सदावर्ते यांना ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली.
तर याप्रकरणातील १०९ संशयित आराेपींना १४ दिवसांची न्‍यायालयीन काेठडी सुनावण्‍यात  आली. या सर्वांचा जामीन अर्जही न्‍यायालयाने फेटाळला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी दुपारी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी षड्यंत्र रचल्याचा आरोप ठेवत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भा.दं.वि. 141, 149, 332, 353 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास अटक करण्यात आली होती. तसेच या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात १०९ जणांविरोधात कट रचून दंगल घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एसटीतील कर्मचार्‍यांसह अन्य आंदोलनकर्ते आणि २३ महिलांचा समावेश आहे.

'सिल्व्हर ओक'वरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईला सुरुवात केली. घटनास्थळावरूनच अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक आयुक्त पांडुरंग शिंदे यांच्या पथकाने रात्री 8 च्या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घरी जात त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.

आझाद मैदानात आंदोलन करणारे सुमारे 100 एसटी कर्मचारी शुक्रवारी दुपारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर चाल करून गेले होते. बंगल्याच्या थेट दारापर्यंत धडकलेल्या या संपकरी कर्मचार्‍यांनी बंगल्यावर चपला भिरकावल्या व दगडफेक केली. महिला कर्मचार्‍यांनी हातावर हात आपटत बांगड्या फोडल्या आणि पवारांच्या निषेधार्थ शिमगा केला. आझाद मैदान ते पेडर रोड हे कर्मचारी धडकले तरी मुंबई पोलिसांना गंधवार्ताही नव्हती. पवारांच्या बंगल्यावर झालेल्या या हल्ल्याने मुंबई पोलिसांचे आणि राज्य सरकारच्याही अब्रूचे अक्षरश: धिंडवडे निघाले. आता हे आंदोलन पूर्वनियोजित होते की उत्स्फूर्त याची चौकशी पोलिस करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT