पुढारी ऑनलाईन
गली बॉय चित्रपटातील एमसी टॉड फोड (Rapper MCTodFod ) या नावाने प्रसिद्ध असलेला रॅपर म्हणजेच धर्मेश परमार (Rapper MCTodFod) यांचे निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूचे कारण कार अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. धर्मेशला मुंबईतील स्ट्रीट रॅपर्स समुहातील रॅपर म्हणून ओळखले जायचे. तो गुजराती भाषेत रॅप करण्यासाठी ओळखला जात होता. पण, वयाच्या २४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.
धर्मेश परमारनेही 'गली बॉय' चित्रपटातील एका ट्रॅकमध्ये आपल्या रॅपची जादू चालवत आवाज दिला होता. याशिवाय तो स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडमध्येही होता. धर्मेश परमारच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. सूत्रांनुसार, एका कार अपघातात त्याने हे जग सोडले. मात्र, अद्याप या वृत्ताला त्याच्या कुटुंबीयांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रणवीर सिंह आणि सिध्दांत चतुर्वेदीने त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.