Latest

Gulab Jamun : पावसासाठी कायपण! मुसळधार बरसण्यासाठी गाढवांना खाऊ घातले ‘गुलाबजाम’! (Video)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही लोक गाढवाला गुलाबजाम खाऊ घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. जाणून घेऊया मध्य प्रदेशातील नागरिकांनी का खाऊ घातले गाढवाला (Donkey) गुलाबजाम (Gulab Jamun).

यंदाच्या पावसाळ्यात काही राज्यांना मुसळधार पुराचा (Flood by Heavy Rain) सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे अशी काही राज्ये आहेत जिथे अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. जिथे पाऊस झालेला नाही तिथे उपाय म्हणून अनेक गोष्टी केल्या जात आहेत. मध्य प्रदेशात सध्या पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेचा (Farmers worried) विषय बनला आहे. पाण्याची समस्या मोठी बनल्याने शहरी आणि ग्रामीण लोकांची स्थिती बिकट आहे. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अनेक युक्त्याही (New idea) अवलंबल्या जात आहेत. यातीलच एक उपाय सध्या चर्चेत आला आहे. एका गावातील शेतकऱ्यांनी पाऊस पडावा यासाठी चक्क गाढवाला गुलाबजाम (Gulab Jamun) खाऊ घातले आहेत. ही व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.

गाढवाला गुलाबजाम देण्यामागचे कारण काय? | What is the reason for giving gulab jamun to a donkey?

मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये शेतकऱ्यांनी पाऊस पाडण्यासाठी एक वेगळी युक्ती वापरली. प्रत्यक्षात काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी गाढवांच्या सहाय्याने शेत नांगरले. शेत नांगरल्यानंतर पाऊस पडला. या आनंदात मंदसौरच्या शेतकऱ्यांनी अधिक पाऊस पडावा म्हणून आता गाढवांना गुलाब जामुन खाऊ घातले. गाढवाला गुलाबजामन खायला देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत काय आहे?

भारतात इंद्रदेवाला पावसाची देवता मानले जाते. इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या अवलंबल्या जातात. या युक्त्यांमध्ये अनेक वेळा बेडकांना ग्रामीण भागात भेट देण्याचे प्रकार घडतात. अनेक ठिकाणी बेडकांची लग्नेही लावली जातात. दरम्यान, मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने लोकांना एक युक्ती सुचली. शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी गाढवांना गुलाबजाम खाऊ घातला आहे. गाढवांना गुलाब जामुन खाऊ घालतानाचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT