Latest

Gujrat Election : भाजपचे उमेदवार ‘मेरिट’वरच, नेत्यांचे नातेवाईक वेटिंगवर

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gujrat Election : गुजरात निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व पक्षांनी निवडणुकांसाठी स्ट्रैटिजी बनवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने पहिल्या टप्प्यातील 43 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर आपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर केले आहे. भाजपने अद्याप तरी उमेदवारांची घोषणा केली नसली तरी निवडणुकीत उमेदवारी मेरिटवरच दिली जाईल. नेत्यांच्या नातेवाईकांना वेटिंगवरच ठेवण्यात येणार आले आहे, असे संकेत मिळत आहे.

Gujrat Election : गुजरात निवडणुकीत भाजप कोणत्याही आमदार खासदारांच्या नातेवाईकाला तिकीट देणार नाही. राज्य भाजपच्या संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती खासदार मनसुख वसावा यांनी दिली आहे.

खासदार मनसुख वसावा हे भरूच भाजपचे सांसद आहेत. त्यांच्या मुलीने पक्षाला तिकिट मागितले होते. मात्र, भाजप ने स्पष्ट केले आहे की सांसद किंवा विधायक यांच्या नातेवाईकांना विधानसभेचे तिकिट दिले जाणार नाही.

Gujrat Election : स्वतः मनसुख वसावाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की ते पक्षाच्या निर्णयाचा स्वागत करतात. पक्ष ज्याला देखिल तिकीट देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी ते काम करतील.

दरम्यान, गुजरातमध्ये कोणाला तिकीट द्यायचे हे सांगण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवडणूक समितीची बैठक आज तिस-या दिवशी ही सुरू आहे.

गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये एकूण 182 सीट आहेत. तर गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडेल. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि हिमाचल प्रदेश सह गुजरातचे ही निकाल 8 डिसेंबरला जाहीर होतील.

Gujrat Election : गुजरातमध्ये सध्या एकूण 4.90 कोटी मतदाता आहेत. ज्यामध्ये 2.53 कोटी पुरुष, 2.37 कोटी महिला आणि 1417 तृतीय पंथी मतदार आहेत. 3.24 लाख नवीन वोटर आहेत. मतदानासाठी एकूण 51,782 मतदान केंद्र बनवण्यात आले आहे. 182 मॉडल पोलिंग स्टेशन आहेत. 50 टक्के मतदान केंद्रांवर लाइव प्रसारण केले जाईल. 33 पोलिंग बूथ वर युवा पोलिंग टीम असेल.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT