Latest

Gujarat Election 2022 : आता सलग तिसऱ्यांदा गुजरात विधानसभेत घुमणार मराठी बाणा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने अभुतपूर्व यश मिळवले आहे. गुजरातमध्ये भाजपने १५६ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. दरम्यान, एका मराठी महिलेने तिसऱ्यांदा गुजरातची विधानसभा गाठली आहे. संगीता पाटील असे मराठी महिलेचे नाव आहे. त्यांनी तिसऱ्यांदा लिंबायत या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. (Gujarat Election 2022)

संगीता पाटील या भाजपच्या आमदार आहेत. त्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या विश्वासू सहकारी मानल्या जातात. लिंबायत मराठी भाषिक बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून पाटील यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. लिंबायत मतदारसंघातील मराठी भाषिकांचा त्यांना पाठींबा मिळाला आहे. (Gujarat Election 2022)

लिंबायतमध्ये त्रिशंकू लढत पहायला मिळाली. यामध्ये काँग्रेस उमेदवार गोपाल देविदास पाटील यांना २९ हजार मते मिळाली. तर आपचे उमेदवार पंकजभाई तायडे यांना ३७ हजार लोकांनी पसंती दिली. भाजपच्या उमेदवार संगीता पाटील ९५ हजार मते मिळाली. तीन मराठी उमेदवारामध्ये झालेल्या लढतीत संगीता पाटील यांनी बाजी मारली. लिंबायत मतदारसंघात मराठी लोकांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात ८० हजार मराठी मतदार आहे. यामध्ये ७६ हजार मुस्लीम, ३८ हजार गुजराती, २१ हजार उत्तर भारतीय तर ११ हजार राजस्थानी आणि १२ हजार तेलुगू लोकांचा समावेश आहे. (Gujarat Election 2022)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT