पुढारी ऑनलाइन डेस्क : Google हे आजच्या काळातील आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग झाला आहे. जगातील सगळ्यात मोठा माहितीचा स्रोत म्हणजे Google बाबा! आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल उदाहरणार्थ एखादया शॉपचा नंबर, कस्टमर केअर नंबर, पत्ता शोधायचा असेल तर आपण सरळ Google बाबाला शरण जातो. पण ही सवय आपल्यावर आर्थिक संकटाची कु-हाड कोसळवू शकते. कारण अनेक सायबर फ्रॉड्सने Google च्या या सुविधांचा फायदा फसवणुकीसाठी करत आहे. कसे ते जाणून घ्या…
Google : कस्टमर केअर नंबरचा शोध घेत आहात?
जर तुम्ही एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधून त्यावर कॉल करणार असाल तर तुम्हाला खबरदारी घ्यायला हवी. कारण अनेकदा सायबर फ्रॉड हे नंबर एडिट करून टाकतात. त्यानंतर जेव्हा त्या चुकीच्या नंबरवर तुम्ही कॉल करता तेव्हा ते तुमची सर्व वैयक्तिक आणि गुप्त माहिती जाणून घेतात. नंतर त्याचा उपयोग करून तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतात.
Google : शॉपचा नंबर शोधताना असा होतो फ्रॉड
जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपचा पत्ता किंवा संपर्क क्रमांक शोधता त्यावेळी तुम्हाला अनेक प्रकारची वेगवेगळी माहिती दिसते. इथे तुम्ही मॅपवर जाऊन शॉपच्या डिटेल्स पाहू शकता. या डिटेल्समध्ये Suggest an Edit चा ऑप्शन दिसतो. इथे सहजरित्या कोणीही एडिट करून नंबर आणि पत्ता बदलू शकतो. स्कॅमर्स याच पद्धतीचा उपयोग करत आहेत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे चुकीच्या नंबरवर कॉल केला तर तुम्ही स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकतात.
Google : अशा स्कॅमर्सपासून कसे वाचणार?
अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या तक्रारींची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपली अशा प्रकारे फसवणूक न होण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून संपर्क क्रमांक मिळवणे हाच सर्वात सुरक्षित पर्याय आहे. तसेच समजा तुम्ही गुगल वर टाकून माहिती मिळवत असाल तर ती माहिती खरी आहे याची एकदा खात्री करून घ्या. त्यासाठी तुम्ही एका पेक्षा अधिक लिंक उघडून बघा. किती ठिकाणी एक सारखा नंबर, एक सारखा पत्ता दिसत आहे. ते जाऊन पाहा. लक्षात घ्या Googl ची माहिती नेहमीच खरी नसते.
सायबर स्कॅम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तंत्रज्ञानाने जितकी सुरक्षा वाढवली जात आहे. सायबर फ्रॉड देखिल तितकेच अत्याधुनिक तंत्रज्ञान स्कॅमसाठी शोधून काढत आहेत. त्यामुळे कायम सतर्क आणि सुरक्षित राहणे हेच योग्य!
हे ही वाचा :