Latest

CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयपीएल म्हटलं की क्रिकेट चाहतांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पहायला मिळते. चेन्नई सुपर किंग्स टीमला आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. लोकप्रिय टीम ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी गुड आली आहे. चेन्नईचा संघ संपूर्ण भारतात कुठेही गेला तरी त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असते. हा चेन्नईची टीम सध्या सुरतमध्ये सराव करत आहे. यावेळी चेन्नईच्या कॅप्टन कुल धोनीसोबत मैदानावर दीपक चहर, रॉबिन उथप्पा तयारी करताना दिसले.

आयपीएल २०२२ या हंगामाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व संघांनी मैदानावर सराव सुरू केले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याप्रमाणे खेळत आहे. आयपीएलच्या नव्या सीझनसाठी सरावात धोनीला ३६० अंशात शॉट खेळताना पाहून चाहते खूप खूश आहेत.

चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नईने मागील वर्षाच्या आयपीएल चषकावर आपले नाव कोरले होते. यंदाच्या हंगामात संघात केलेल्या बदलांमुळे चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करेल असे दिसत आहे. वर्षानंतर सरावासाठी मैदानात उतरलेल्या धोनीच्या कौशल्यात कुठेही कमतरता दिसत नव्हती. चेन्नईला यंदाच्या हंगामातील पहिला सामना कोलकाताशी खेळायचा आहे. आयपीएल २०२२ हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दि. २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडेवर स्टेडियमवर होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघ :

चेन्नईने रिटेन केलेले खेळाडू : एमएस धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड

लिलावात खरेदी केलेले खेळाडू : दीपक चहर, अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, आणि रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश टीक्षाना, राजवर्धन हंगरगेकर, सिमरजीत सिंग, देवेन कॉनवे, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, अॅडम मिलने, सुभ्रांश सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीशन, के भगत वर्मा.

&

nbsp;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT