पुढारी ऑनलाईन डेस्क : हवेत उडणारी कार (Flying Bike), बस पाठोपाठ ऑटोमोबाईल क्षेत्रात हवेत उडणारी बाईक आली आहे. AERWINS XTurismo असं या बाईकचं नाव आहे. या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. हवेत उडणाऱ्या बाईकची झलक बाईकप्रेमींच लक्ष वेधून घेत आहे.
हवेत उडणारी बाईक म्हटल्यावर बऱ्याच जणांचे डोळे विस्फारले असतील. पण नुकतीच हवेत उडणारी बाईक तयार करण्यात आली आहे. या बाईकचा हवेत उडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बाईकची रचना एखाद्या ड्रोनप्रमाणे आहे. या बाईकची रचना पाहून या बाईकची चर्चा रंगत आहे. हवेत उडणारी जगातील पहिली बाईक असल्याने ही बाईक चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनली आहे.
जगातील पहिल्या उडत्या बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. XTURISMO हॉव्हर ही बाईक ६२ mph पर्यंत वेगात ४० मिनिटे उडू शकते. या बाईकचे वजन अंदाजे २९९ किलो (६६१ पाउंड) आहे. नुकतीच अमेरिकेत या बाईकची झलक दाखवण्यात आली आहे. जरी हवेत उडणारी बाईक असली तरी ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहे. सध्या या बाईकची किंमत ७ लाख ७७ हजार डॉलर इतकी आहे. पण कंपनीच्या सीईओंकडून सांगण्यात आले आहे की लवकरच कमी किंमतीत सुद्धा या गाडीची निर्मिती केली जाईल.
हेही वाचलंत का?