Latest

Gold Silver Price Today | सोने, चांदी आणखी स्वस्त, गाठली ६ महिन्यांतील निचांकी पातळी

दीपक दि. भांदिगरे

Gold Silver Price Today : सोने, चांदी दरात घसरण सुरुच आहे. सराफा बाजारात आज शुक्रवारी (दि.१६) शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४९ हजारांच्या जवळ आला. पुढील काही दिवसांत सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सोने खरेदीसाठी चांगली संधी आहे. आज शुक्रवारी (दि.१६) सोन्याच्या दरात ५५२ रुपयांची घसरण झाली. यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,३७४ रुपयांवर आला आहे. काल गुरुवारी सोन्याचा भाव ४९,९२६ रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान चांदीच्या दरात प्रति किलोमागे ७६० रुपयांची घट झाली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,३७४ रुपये, २३ कॅरेट ४९,१७६ रुपये, २२ कॅरेट ४५,२२७ रुपये, १८ कॅरेट ३७,०३१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २८,८८४ रुपयांवर खुला झाला होता. तर चांदी प्रति किलो ५५,५७० रुपयांवर व्यवहार करत आहे.

MCX वर सोने प्रति १० ग्रॅम ०.१६ टक्क्याने घसरून ४९,२३१ रुपयांवर आले. हा सोन्याचा भाव ६ महिन्यांतील निचांकी आहे. MCX वर चांदी ०.४ टक्के घसरून प्रति किलो ५६,१९४ रुपयांवर आली आहे. या आठवड्यात आतापर्यंत सोने १,५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरातील चढ-उतार हा अमेरिकी डॉलरवर अवलंबून आहे. भारतातील सोन्याची किंमत आणि आयात शुल्क याचा जवळचा संबंध आहे. अमेरिकी डॉलर मजबूत झाला आहे. त्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात किमान ७५ बेसिस पॉइंट्सची दर वाढ लागू करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे.

Gold Silver Price Today असे ओळखा शुद्ध सोने?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT