पुढारी डेस्क : सराफा बाजारात आज शुक्रवारी सोन्याच्या दरात घट दिसून आली. शुद्ध सोन्याचा दर आज (Gold prices today) प्रति १० ग्रॅम ५१,८६८ रुपयांवर खुला झाला. काल गुरुवारी हा दर ५२,०८१ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. यात आज २१३ रुपयांची घट दिसून आली. तर चांदी १,०३६ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold prices today आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,८६८ रुपये, २३ कॅरेट ५१,६६० रुपये, २२ कॅरेट ४७,५११ रुपये, १८ कॅरेट ३८,९०१ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,३४३ रुपयां खुला झाला होता. चांदी प्रति किलो ५६,०६४ रुपयांवर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर तीन आठवड्यांच्या निचांकी पातळीवर घसरला. डॉलर मजबूत झाला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिक व्याजदर वाढींच्या शक्यतांमुळे सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ सुरु होती. आज सकाळी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम ५१,४५१ रुपये आणि चांदीचा भाव ०.९ टक्क्यांनी घसरून ५५,९३६ रुपये प्रति किलोग्रामवर होता.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.