Latest

Gold price : सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold price) घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे ४२७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज गुरुवारी (दि.७) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०,८७१ रुपयांवर खुला झाला. याआधीच्या दिवशी बुधवारी सोन्याचा दर ५१,२९८ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज घसरण दिसून आली. दरम्यान, सध्याचा दर उच्चांकी दराच्या तुलनेत ५,३२९ रुपयांनी कमी आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२०० रुपयांवर पोहोचले होते. आता सोने ५० हजारांवर आले आहे. सोन्याप्रमाणे चांदीही महागली आहे. चांदीचा प्रति किलो दर ५६,४४९ रुपयांवरुन ५६,५८३ रुपयांवर पोहोचला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion and Jewellers Association) माहितीनुसार, गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर (Gold price) ५०,८७१ रुपये, २३ कॅरेट ५०,६६७ रुपये, २२ कॅरेट ४६,५९८ रुपये, १८ कॅरेट ३८,१५३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,७६० रुपयांवर खुला झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकेत सोन्याचा दर १९.७१ डॉलरने घसरून प्रति औंस १,७४५ डॉलरवर आला आहे. तर चांदी तेजीत आली असल्याचे दिसून आले आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT