गोवा

पणजी : जमीन हडप प्रकरणात राजकारणीही सामील; संशयितांची कबुली

अनुराधा कोरवी

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गाजत असलेल्या जमीन हडप प्रकरणात काही राजकारण्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांनी याबाबत कबुली दिली असून याबाबत अधिक तपास झाल्याशिवाय कोणतीही माहिती उघड केली जाणार नाही, असे पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी सांगितले. शुक्रवारी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक निधीन वालसन, उपाधीक्षक संतोष देसाई, उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू व वासुदेव हडकोणकर उपस्थित होत

बिष्णोई यांनी सांगितले की, या प्रकरणातील सर्वात मोठ्या तीन मास्टरमाईंडना पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. यामध्ये राजकुमार मैथी, रॉयसन रॉड्रीग्स आणि सेन्ड्रीक फर्नांडिस यांचा समावेश आहे. जमीन हडप प्रकरणाची संकल्पना आधी अटक झालेला सोहेल खान ऊर्फ मायकल आणि राजकुमार ऊर्फ राजू यांची होती.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघांना पाच दिवसांचपोलिस कोठडी मिळाली आहे. यामुळे अटक झालेल्या आरोपींची संख्या 15 झाली आहे.
सोहेल खान व सोहेल खान हे दोघे ज्यांची नावे पोर्तुगीज नावांशी साधर्म्य पावतात अशा लोकांना जमीन हडपण्यासाठी तयार करत होते. यामध्ये मायकल आणि सेन्ड्रीक यांच्या दोन टोळ्या या प्रकरणात जामिनावरील आरोपींना पुन्हा अटक होईल.

ओमवीर सिंग यांनी सांगितले की, याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या आरोपींविरुद्ध दुसर्‍या प्रकरणात पुरावे सापडले असून लवकरच आम्ही त्यांना पुन्हा अटक करणार आहोत. त्यांना सोडले जाणार नाही. सर्वाधिक गुंतल्या आहेत. सेन्ड्रीकने 64,782 चौ. मी क्षेत्राच्या 26 मालमत्तेचे तर रॉयसनने सुमारे 1 लाख 30 चौ मी च्या 61 मालमत्तांचे बनावट कागपत्र बनवून जमीन हडप केली आहे. अशाप्रकारे एकूण 95 मालमत्तांची बनावट कागदपत्रे हाती लागली आहेत.यातील रॉयसन सतत एका देशातून दुसर्‍या देशात जात होता.

गुरुवारी रात्री पोलिसांनी त्याला मुबंई विमानतळावरून अटक केली. मायकलचा उजवा हात असणार्‍या राजूने रॉयसन सोबत आपला वेगळा ग्रुप करून जमीन हडपणे सुरू केले. तिघांनी कमीत कमी आठ ते दहा बँकेत आपली खाती उघडून त्याद्वारे पैसे फिरवणे सुरू केले. तिघांनी अनेकांना गंडा घातला आहे. आम्ही सर्व आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून ही केस मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT