नवी दिल्ली: भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी चर्चा करताना गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, बाजूला आमदार संकल्प आमोणकर. 
गोवा

रिक्त मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार! राजकीय उत्सुकता : दामू नाईक यांनी घेतली नितीन नवीन यांची भेट

Vacant Ministerial Post-रिक्त मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार! राजकीय उत्सुकता : दामू नाईक यांनी घेतली नितीन नवीन यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

पणजी : भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यातील मंत्री व आमदारांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर लगेच शनिवारी दुसऱ्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह सात भाजप नेते दिल्लीला गेले आहेत. मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याबाबत व पुढील निवडणुकीच्या उमेदवारीबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. रिक्त मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दामू नाईक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निवडणूक आराखडा अध्यक्ष नवीन यांना सादर केला. त्याच सोबत नाईक यांनी गोव्यातील मंत्री व आमदारांच्या कामाचे प्रगती पुस्तक नवीन यांना दिले असावे, अशी राज्यात चर्चा सुरू आहे. नाईक हे नितीन नवीन यांच्याव्यतिरिक्त भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे ते या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना राज्यातील राजकीय स्थिती व येत्या निवडणुकीच्या तयारीबाबत आणि मंत्री व आमदारांच्या कामाबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथून ते शनिवारी रात्री दिल्लीला पोचू शकतात. तसे झाल्यास तत्कालीन कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेले मंत्रिपद भरण्याबाबत ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

दामू नाईक यांच्या सोबत मंत्री रमेश तवडकर, आमदार संकल्प आमोणकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तुषार केळकर, महिला मोर्चा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर व महिला नेत्या आरती बांदोडकर दिल्लीला गेले आहेत.

सेवा संकल्प अभियानात सहभाग

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसेवेची पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान आयोजित करण्यासाठी नवी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यालयात आयोजित कार्यशाळेत ते व त्यांच्या सोबतचे गोवा भाजपचे सर्व नेते सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT