Water Scarcity Pudhari
गोवा

Colva Panchayat Water Scarcity | कोलवा पंचायत क्षेत्रातील चार गावांतील 709 कुटुंबे तीव्र पाणीटंचाईमुळे त्रस्त; कायमस्वरूपी उपायांची मागणी

Colva Panchayat Water Scarcity | 709 कुटुंबांची स्वाक्षरी मोहीम : कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कोलवा पंचायत क्षेत्रातील सेनाभाटी, वानेली, कोलवा या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे ७०९ कुटुंबातील सुमारे २,८३६ रहिवासी त्रस्त आहेत. कमी दाबाने पाणी येणे, अनियमित पुरवठा आणि नळांमधून दूषित पाणी मिळणे या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यासाठी १ मे ते २६ सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिेनंतर संबंधित सरकारी खात्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेल्या ७०९ कुटुंबांपैकी ६७१ कुटुंबांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे तक्रार नोंदवली. तर ४९९ कुटुंबांनी अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या मांडली.

२९ कुटुंबांनी वारंवार पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या आकडेवारीवरून चारही गावामधील पाणीपुरवठ्याची समस्या किती व्यापक आहे, हे स्पष्ट होते.
काही घरांमध्ये नळांमधून गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या समस्येचा परिसरातील सुमारे ४४ टक्के लोकसंख्येवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त बैठकीतून कृती आराखडा करा
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते आणि संबंधित पाणीपुरवठा यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चारही गावांतील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सरकारी खात्यांनी समन्वयाने काम करावे आणि निश्चित कालमर्यादेत अंमलबजावणी करता येईल, असा कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जलवाहिन्यांची क्षमता, पंपिंग व्यवस्था, पाणीपुरवठ्यातील दाबाचे विभाग आणि वितरणादरम्यान होणारी गळती यांचे सविस्तर परीक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या तपासणीनंतर आवश्यक मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याची उपलब्धता विचारat घेऊन नवीन निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवर तात्पुरते निर्बंध घालावेत. तसेच हॉटेल्र्स आणि अन्य व्यावसायिक आस्थापनांमधील जलतरण तलावांच्या वापरापर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT