Court Verdict  Pudhari
गोवा

Vasco Minor Girl Case | वास्को अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट बाल न्यायालयाकडून मंजूर!

Vasco Minor Girl Case | सीबीआय अपयशी ; क्लोजर रिपोर्टला न्यायालयाची मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथील एका शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारामुळे राज्यात खळबळ माजली होती. संशयिताचा शोध लावण्याचे आव्हान सीबीआयला न पेलल्याने त्याचा तपास अखेर बंद करण्यास पणजी बाल न्यायालयाने परवानगी दिली आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सादर केलेला क्लोजर रिपोर्ट बाल न्यायालयाने स्वीकारला आहे. या प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून तो सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर अनेक वर्षे सुरू होता.

मात्र, तपासादरम्यान गुन्हेगाराची ओळख पटवण्यात किंवा त्याला अटक करण्यात सीबीआयलाही यश आले नाही. उपलब्ध पुरावे आणि तपासातून आरोपीपर्यंत पोहोचण्यात अपयश आल्याने सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता.

बाल न्यायालयाने सीबीआयचा अहवाल स्वीकारत तपास बंद करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे दीर्घकाळ तपास सुरू असलेल्या या प्रकरणाला आता कायदेशीरदृष्ट्या पूर्णविराम मिळाला आहे.
या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा, विशेषतः मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृहे आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, अनेक वर्षांच्या तपासानंतरही पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला आरोपी शोधण्यात तपास यंत्रणेला यश आले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT