वास्को : आग दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना पाठिंबा दर्शविण्यासाठी पालिका मार्केट संघटनेने दुकाने बंद ठेवली होती. (छाया : शेखर कळंगुटकर) 
गोवा

Goa Market Association Shutdown|नुकसानग्रस्तांना पाठिंब्यासाठी बाजार संघटनेकडून दुकाने बंद

goa Market Association Shutdown In Support Of Fire Victims -सकाळच्या सत्रात वास्को सामसूम; तत्काळ भरपाई देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : मुरगाव पालिकेच्या मॉडर्न मार्केटला आग लागून नुकसान झालेल्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी, मुरगाव पालिका मार्केट संघाने शुक्रवारी दुकाने सकाळच्या सत्रात बंद ठेवली होती. यावेळी मार्केट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडून त्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती केली.

वास्को मॉडर्न मार्केटला आग

लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान दुकान मालकांचे झालेले आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी शुक्रवार (दि.३०) रोजी मुरगाव पालिका मार्केट संघटनेतर्फे पाठिंबा दिला. मार्केट संघटनेने शांतताप्रिय पद्धतीने आपली ३०० दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत बंद ठेऊन, मॉडर्न मार्केटमधील नुकसानग्रस्त दुकान मालकांना सहकार्य केले. तसेच मुरगाव पालिका मार्केट संघटना आग नुकसान झालेल्यांना आर्थिक सहकार्य करणार आहे.

मॉर्डन मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आग लागली त्या पद्धतीची दुर्घटना होऊ नये, यासाठी मुरगाव पालिकेने नवीन फायर हायड्रंट बसविण्याची मागणी केली आहे. मुरगाव पालिकेने आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देणे तेवढेच महत्त्वाचे असल्याची माहिती मार्केट संघटनेने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT