Type 2 Diabetes : मधुमेह टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये शुगर बोर्ड, शिक्षण विभागाचा निर्णय  File Photo
गोवा

Type 2 Diabetes Dengue Risk | टाईप-२ मधुमेही रुग्णांना डेंग्यूचा जीवघेणा धोका

Type 2 Diabetes Dengue Risk | टाईप-२ मधुमेही रुग्णांना डेंग्यूचा जीवघेणा धोका; तज्ज्ञांच्या अभ्यासात निष्कर्ष : रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास गुंतागुंत शक्य

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

टाईप-२ मधुमेह असलेल्या व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्यास गंभीर आणि जीवघेण्या गुंतागुंतीचा धोका लक्षणीयरीत्या वाढत असल्याचा निष्कर्ष अग्रगण्य तज्ज्ञांच्या आढावा अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळे डेंग्यूग्रस्त प्रदेशांतील मधुमेही रुग्णांच्या नियमित उपचार पद्धतीत डेंग्यू लसीकरणाचा समावेश करण्याची शिफारस या अभ्यासात करण्यात आली आहे.

हा शोधनिबंध 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ डायबेटिस अँड टेक्नॉलॉजी'मध्ये प्रकाशित होणार असून, त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली. मधुमेहंतज्ज्ञ डॉ. जोथीदेव केशवदेव यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला.

यामध्ये देशभरातील अनेक आघाडीच्या मधुमेहंतज्ज्ञांसह इंटरच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नीती पाल यांनी सहलेखक म्हणून सहभाग नोंदविला आहे. हा शोधनिबंध नुकताच कोवलम येथे झालेल्या १४ व्या ज्योती-देव प्रोफेशनल एज्युकेशन फोरमच्या जागतिक मधुमेह परिषदेत सादर करण्यात आला.

या अभ्यासपुस्तिकेचे प्रकाशन केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांच्या हस्ते झाले. अभ्यासानुसार, रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढलेले राहिल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

मधुमेहींनी खबरदारी घ्यावी : डॉ. शेखर साळकर

"टाईप-२ मधुमेह हा प्रामुख्याने २५ वर्षांवरील व्यक्तींमध्ये आढळतो. मधुमेह नियंत्रणात नसेल व अशा व्यक्तीला डेंग्यूची लागण झाली, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी आणि डेंग्यूची लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत," असा सल्ला ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT