Chorla Ghat Truck Accident  
गोवा

Chorla Ghat Truck Accident | चोर्ला घाटात काळजाचा थरकाप! मालवाहू ट्रक दरीत कोसळला; चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Chorla Ghat Truck Accident | चोर्ला घाटात भीषण अपघात; एक जखमी

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

बेळगावहून गोव्याकडे मालवाहतूक करणारा ट्रक (एपी ३९ जे १२५९) बुधवारी पहाटे चोर्ला घाट परिसरात दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला.

जखमीला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. अपघातग्रस्त वाहनातील मृत चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाळपई अग्निशामक दलाला सुमारे १२ तास कठोर परिश्रम करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव भागातून प्लायवूड घेऊन येणारा अवजड ट्रक पहाटे ४ च्या सुमारास घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने दरीत कोसळला. अपघातात ट्रकमधील माल चालकावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली.

चोर्ला घाट परिसरात अनेक धोकादायक वळणे असून यापूर्वीही अशा अपघातांच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, चालकाचा मृतदेह ट्रकमध्ये अडकला असल्याने वाहनाचे काही भाग कापून काढावे लागले. जवळपास १२ तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

उपाययोजनांसाठी अहवाल

उपजिल्हाधिकारी सत्तरीचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुर्टीकर, मामलेदार देवेंद्र बाणावलीकर आणि संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी कुर्डीकर यांनी हा अपघात अत्यंत हृदयद्रावक असल्याचे सांगत घाटातील धोकादायक वळणांबाबत उपाययोजना करण्यासाठी अहवाल संबंधित यंत्रणेला सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT