Goa Health Alert 
गोवा

Goa Health Alert: गोव्यात 34.8 टक्के नागरिक फॅटी लिव्हराच्या विळख्यात; हे आहे प्रमुख कारण

Goa Health Alert: बैठी जीवनशैली, लठ्ठपणासह जंक फूडचे सेवन प्रमुख कारणे

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) यांच्या अभ्यासानुसार राज्यातील ३४.८ टक्के लोकसंख्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) या आजाराने ग्रस्त असून, तरुण आणि बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.

जागतिक स्तरावर सुमारे ३० टक्के, तर भारतात ३३ टक्के लोकांना या आजाराचा त्रास आहे. हा अभ्यास डॉ. पी. ए. वाघुरमेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला.

असोसिएट कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट डॉ. अक्षय जैन यांनी बैठी जीवनशैली, अस्वास्थ्यकर आहार, लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे फॅटी लिव्हरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले. ही वाढती संख्या चिंताजनक असून त्याबाबत तातडीने गांभीर्याने उपाय करण्याची गरज आहे.

गोवा मेडिकल कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. आर. जी. वाईजमन पिंटो यांनी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळत असल्याचे नमूद केले. अभ्यासानुसार ८४ टक्के आयटी व्यावसायिकांना एनएएफएलडी, तर ७१ टक्के जण जादा वजनाचे किंवा लठ्ठ असल्याचे आढळले आहे.

मडगाव येथील वरिष्ठ सल्लागार डॉ. जोस फिलिप अल्वारीस यांनी फॅटी लिव्हरला 'सायलेंट डिसीज' संबोधत नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, कॅलरीचे मर्यादित सेवन आणि दररोज सात ते आठ तासांची झोप या जीवनशैलीतील बदलांचा सल्ला दिला.

फॅटी लिव्हरची प्रमुख कारणे

  • अनियमित जीवनशैली

  • व्यायामाचा अभाव

  • दीर्घकाळ बैठे काम

  • जंक फूड सेवन

  • अपुरी झोप

  • तणाव

  • धूम्रपान

  • मद्यपान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT