मडगाव ; पुढारी वृत्तसेवा
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार वालांका आलेमाव यांचे बंधू सावियो आलेमाव यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नावेली येथील हाऊजिंग बोर्ड भागांत काही वेळासाठी तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी हटविली.
या विषयी अधिक माहिती अशी की, सवियो येथे मतदानासाठी आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रेहान मुजावर यांचे कार्यकर्तेही येथे आले होते. काही कारणावरून दोन्ही उमेदवारांच्या गटामध्ये वाद उद्भवला. यावेळी सावियो यांनी आक्षेपार्ह विधान केले. यावेळी गर्दी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी समज देऊनही गर्दी कमी न केल्याने शेवटी लाठीचार्ज करून त्यांनी गर्दी हटविली.
हेही वाचलं का?