Tarun Tejpal Case  
गोवा

Tarun Tejpal Case | तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता; साक्षीतील विसंगतीमुळे पीडितेची साक्ष अविश्वासार्ह

Tarun Tejpal Case | तरुण तेजपाल निर्दोष मुक्तता प्रकरण : साक्षीतील विसंगतीमुळे पीडितेची साक्ष अविश्वासार्ह, बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण; ३० जुलैला प्रतियुक्तिवाद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडित तरुणीने तोंडी साक्षीमध्ये व त्या काळातील ईमेल, व्हॉट्सॲप संदेश तसेच इतर दस्तावेजांमध्ये वारंवार विसंगती आहेत. त्यामुळे पीडित तरुणीची (फिर्यादी) साक्ष विश्वासार्ह मानता येत नसल्याचा युक्तिवाद तिसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर तेजपाल यांचे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केला. यावेळी तरुण तेजपाल न्यायालयात उपस्थित होते.

तहलकाचे माजी संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांना निर्दोष मुक्त ठरविण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने दाखल केलेल्या आव्हान अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात तेजपाल यांच्या वकिलांचा (बचाव पक्ष) तीन दिवसांचा अंतिम युक्तिवाद शनिवारी (१८ जुलै) पूर्ण झाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार असून, त्या दिवशी गोवा सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता प्रतियुक्तिवाद करणार आहेत.

बचाव पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये फिर्यादीने व्हॉट्स ॲपवर पाठविलेल्या एका संदेशाचाही उल्लेख करण्यात आला. त्यामध्ये तिने थिंकफेस्ट कार्यक्रमातील सहभागींबाबत "मी त्यांच्यावर लैंगिक दहशतीचे राज्य निर्माण करणार आहे" असा मजकूर लिहिला होता.

नंतर हा संदेश विनोद म्हणून पाठविल्याचे फिर्यादीने स्पष्ट केले असले, तरी त्या काळातील हा महत्त्वाचा दस्तावेजी पुरावा असल्याने तिच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करताना त्याचा विचार व्हावा, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT