Pernem Crime News Pudhari
गोवा

Goa Death News | न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतलेल्या संशयिताचा मृत्यू

Goa Death News | बलात्काराच्या प्रकरणातील एका संशयिताने मेरशी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बलात्काराच्या प्रकरणातील एका संशयिताने मेरशी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याने तो गंभीर जखमी झाला होता. गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रानी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयिताविरुद्ध सत्र न्यायालयाने अजमीनपात्र वॉरंट जारी केले होते. शुक्रवारी तो या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाला होता. न्यायालयाकडून जामीन रद्द होऊन पुन्हा कारागृहात रवाणगी होण्याच्या भीतीने त्याने न्यायलय संकुलाच्या आतील बाजूने असलेल्या मोकळ्या जागेतून पाचव्या मजल्यावरून उडी घेतली.

मात्र, तो दुसऱ्या मजल्यावर पडल्याने गंभीर जखमी झाला. घटनेनंतर न्यायलय परिसरार खळबळ उडाली. जखमी संशयिताला तातडीने गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेचा पुढील तपास जुने गोवे पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT