प्रा. सुभाष वेलिंगकर Pudhari File Photo
गोवा

Subash Velingkar | उत्खनन केल्यास धर्मांतर, छळाचे पुरावे सापडतील : वेलिंगकर

Subash Velingkar | गोवेतील वस्तुसंग्रहालया समोरील जागेत खोदकाम करून पाहिल्यास धर्मांतर, छळाचे पुरावे सापडतील, असे मत गोमंतक हिंदू रक्षा आघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुढारी : वृत्तसेवा जुने

गोवेतील वस्तुसंग्रहालया समोरील जागेत खोदकाम करून पाहिल्यास धर्मांतर, छळाचे पुरावे सापडतील, असे मत गोमंतक हिंदू रक्षा आघाडीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले आहे.

गोव्यात ४५० वर्षे सत्ता राबवून गोमंतकीयांवर अत्याचार केलेल्या पोर्तुगीजांनी सुमारे अडीचशे वर्षे गोव्यातील हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी हजारो हिंदूंना जुने गोवेतील हात कातरो खांबाला बांधून तेथे त्यांचे हात, पाय कापले होते. हे सत्य असताना कोणीतरी पोर्तुगीजधार्जिणी व्यक्ती येऊन हात कातरो खांबावर हिंदूंवर अत्याचार झालेच नाहीत, असे सांगते हे चुकीचे आहे.

त्याला सत्य जाणून घ्यायचे असेल तर जुने गोवे येथे सध्याच्या वस्तुसंग्रहालयाच्या समोरील खोदकाम जागेत करून पाहावे, तेथे हजारो हिंदूंचे सांगाडे व कवट्या सापडतील, असे मत वेलिंगकर यांनी व्यक्त केले आहे.

दोन दिवसांपूर्वी जुने गोवे येथील हात कातरो खांबावर हिंदूंवर अत्याचार झाले नसल्याचा दावा डेल मिनेझिस यांनी केला होता. त्यांचा हा दावा अल्पसंख्यकांनी उचलून धरलेला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण तज्ज्ञ असलेले प्रा. वेलिंगकर यांनी मिनेझिस यांना उत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ जारी केला आहे व मिनेझिस यांच्या विधानाचा समाचार घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT