Marigold Flower Pudhari
गोवा

Marigold Flower Production | दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात झेंडूच्या फुलांची मोठी मागणी; सध्या राज्यात केवळ 40 टक्के उत्पादन

Marigold Flower Production | 130 हेक्टर क्षेत्रावर लागवड; शेजारील राज्यातून 60 टक्के फुले

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दसरा आणि दिवाळीच्या सणासाठी कृषी खाते सज्ज झाले आहे. खंडेनवमी, दसरा आणि दिवाळीसाठी गोव्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, सद्यस्थितीत गोव्यात सुमारे ४० टक्क्केच झेंडूचे उत्पादन होत असून, ६० टक्के उत्पादनासाठी अन्य राज्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

हा हंगाम एक ते दीड महिना असून याच काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. झेंडू फुलांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सरकार आणि कृषी खाते करीत आहे.

मात्र, १०० टक्क्यांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी दोन तीन वर्षे प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्र झेंडू लागवडीखाली आणावे लागणार आहे. राज्यात सध्या १२५ ते १३० हेक्टरवर झेंडू लागवड केली आहे.

फुलशेतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...
यावर्षी ही पहिली बॅच असून, ४ लाख रोपांचे वाटप केले आहे. पुढच्या वर्षी आणखी रोपे वाटप केली जातील. जसजशी लागवड व क्षेत्र वाढेल, तसे उत्पादनही वाढेल. येत्या २ ते ३ वर्षांत १०० टक्के उत्पादनातून राज्य झेंडूच्या शेतीत स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT