South Kashi Goa file photo
गोवा

Goa | पूर्वेतील रोम नव्हे, दक्षिण काशी गोवा

South Kashi Goa-प्राचीन मंदिरांतून गोव्याचा इतिहास; वास्तुशिल्प अन् परंपरेचा सुंदर संगम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोवा म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर प्रथम येतात ते समुद्रकिनारे, नाईटलाईफ आणि पर्यटनाची रंगतदार दुनिया. मात्र, या भूमीची खरी ओळख तिच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशात दडलेली आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकाने केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरतेच आपले दर्शन मर्यादित न ठेवता येथील प्राचीन आणि देखणी मंदिरेही अनुभवली पाहिजेत. या मंदिरांमधून गोव्याचा इतिहास, वास्तुशिल्प आणि श्रद्धेची परंपरा यांचा सुंदर संगम दिसून येतो.

आला उन्हाळा चला पर्यटनाला पणजीपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर मंगेशी येथील मंदिर हे गोव्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. श्री मंगेशाचे हे मंदिर पांढऱ्या शुभ्र वास्तुशैलीसाठी व उंच दीपस्तंभासाठी ओळखले जाते.

शांत, प्रसन्न वातावरण आणि नाजूक कोरीव काम यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला आध्यात्मिक अनुभव मिळतो. लता मंगेशकर यांच्या गाण्यात आढळणारे 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' ते हेच. पणजीहन फोंडामार्गे येथे सहज पोहोचता येते. बस सेवा, खासगी टॅक्सी किंवा भाड्याने घेतलेली स्कूटर हा प्रवास अधिक सोयीस्कर बनवतात.

कसे जायचे?

गोव्यातील मंदिरांना भेट देण्यासाठी कदंब महामंडळाची बससेवा स्वस्त आणि सोयीस्कर आहे. टूर ऑपरेटर्सकडून एकदिवसीय मंदिर दर्शनाच्या योजनादेखील मिळतात. याशिवाय, भाड्याने स्कूटर किंवा टॅक्सी घेऊन स्वतःच्या सोयीने फिरणे हा पर्यटकांमध्ये लोकप्रिय पर्याय आहे.

श्री शांतादुर्गा मंदिर: कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर पणजीतून ३३ किलोमीटर अंतरावर आहे.

नागेश-रामनाथ देवस्थान: या मंदिरांसमोरील तळींमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

श्री महालसा नारायणी: वेर्णा येथे वसलेले श्री महालसा नारायणी हे मंदिरही विशेष आकर्षण ठरते.

बिर्ला मंदिर सांकवाळ येथे असलेले हे मंदिर आधुनिक शैलीतील आहे. हे सुबक वास्तुशैलीसाठी ओळखले जाते.

महादेव मंदिर: तांबडी सुर्ल येथे असलेले महादेवाचे मंदिर हे गोव्याचे सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT