जप्त केलेली व्हेल माशाची उलटी. Pudhari File Photo
गोवा

Whale Vomit Smuggling | सिंधुदुर्गात वन विभागाची मोठी कारवाई! शिरोड्यात 7 कोटींची 'व्हेल माशाची उलटी' जप्त

Whale Vomit Smuggling | चौघांना अटक; सिंधुदुर्ग वन विभागाची शिरोडा येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा परिसरात वन विभागाच्या फिरत्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल ७ कोटी रुपये किमतीची दुर्मीळ व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी बेकायदेशीर विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या चार स्थानिक संशयितांना मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरोडा परिसरात काही व्यक्ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आणि कोट्यवधीची किंमत असलेल्या 'व्हेल माशाची उलटी'ची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. १६) सायंकाळी एक विशेष मोहीम राबवण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT