Land Scam Pudhari
गोवा

Comunidade Land Scam | सावईकर दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर म्हापसा न्यायालयाचा आदेश 28 ऑक्टोबर रोजी

Comunidade Land Scam | म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणावरील आदेश २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राखून ठेवून दिला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सुकूर - पर्वरी येथील कोमुनिदादच्या दोन भूखंडांवर कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी व ताबाचा दावा केल्याच्या प्रकरणांत राजेश सावईकर आणि रोशनी सावईकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने या प्रकरणावरील आदेश २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राखून ठेवून दिला आहे.

सेरूला कोमुनिदादचे अॅटर्नी पीटर मार्टिन्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सावईकर दांपत्यासह अन्य व्यक्तींनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्याद्वारे सुकूर येथील दोन कोमुनिदाद भूखंडांवर बेकायदेशीरपणे मालकी व ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणे, कोमुनिदादच्या जमिनीचे कथित फसवे स्थानांतर आणि त्या आधारे मालकी हक्काचा दावा केल्याचे आरोप आहेत.

विवादित कागदपत्रांची सत्यता आणि जमिनीच्या व्यवहारामागील परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या कथित जमीन गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि व्यापक चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही पुढे आली आहे. त्यामुळे २८ ऑक्टोबर रोजी न्यायालय या अटकपूर्व जामीन अर्जावर काय निर्णय देते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT