Gas Cylinder  Pudhari File Photo
गोवा

Sattari HP Gas Cylinder | सत्तरी तालुक्यात एचपी गॅस ग्राहकांची लूट

Sattari HP Gas Cylinder | 30 किलोच्या सिलिंडरमध्ये २ किलो गॅस कमी; चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यात एचपी गॅस वितरकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलिंडरमध्ये वजनाची मोठी तफावत आढळून आली असून, तब्बल दोन किलो गॅस कमी भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी नागरी पुरवठा खात्याकडे धाव घेत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्तरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून गॅस वितरण व्यवस्था कोलमडली असून, ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याचे वितरकांनीही मान्य केले आहे.

या गोंधळाचा फायदा घेत सिलिंडरमधून गॅस चोरी करण्याचे प्रकार वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती वापराचा सिलेंडर (एकूण सुमारे ३० किलो वजन) अनेक ठिकाणी २ किलोने कमी भरलेला आढळत आहे.

वायफळे येथील सजग नागरिक व गॅस ग्राहक नजीर खान यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. ते म्हणाले, 'आम्ही सिलिंडरचे वजन तपासले असता दोन किलोची तफावत आढळली. हा प्रकार म्हणजे ग्राहकांच्या खिशावर थेट दरोडा असून, काळात सामान्य महागाईच्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.'

केवळ शहरी भागातच नव्हे, तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातूनही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेकांनी पत्रकार आणि नागरी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. वाळपई येथील कार्यालयात तक्रारी दाखल करूनही दखल घेतलेली नाही.

ग्राहकांनीही सावध राहावे

या पार्श्वभूमीवर ग्राहकांनीही सावध राहणे आवश्यक आहे. 'ज्यांनी सिलिंडरचे वजन तपासले, त्यांनाच ही फसवणूक लक्षात आली. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने सिलिंडर घेताना त्याचे वजन काट्यावर तपासून घ्यावे,' असे आवाहन नजीर खान आणि इतर ग्राहकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT