PVC Pipe Price Hike | युद्धाचा चटका बळीराजाला! पीव्हीसी पाइप अन् कृषी साहित्याच्या किमतीत 40 टक्क्यांची भरमसाठ वाढ

PVC Pipe Price Hike | बळीराजाचे वार्षिक बजेट कोलमडले : तूर्तास शेतकऱ्यांनी कामे पुढे ढकलली
PVC Pipe Price Hike
PVC Pipe Price Hike
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे. युद्धाच्या परिणामांमुळे कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत होऊन शेतीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाइप, फिटिंग्ज आणि इतर कृषी साहित्याच्या किमतीत ३५ ते ४० टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.

PVC Pipe Price Hike
Nashik IT Company Conversion Case | धर्मांधता अन् त्यातून शोषण हे अस्वीकारार्हच !

यामुळे उन्हाळ्यात पाइपलाइनची कामे काढणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, अनेकांनी ही कामे तूर्त पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात साधारणपणे खरीप हंगामातील पीक काढणीनंतर उन्हाळ्यामध्ये विहीर खोदकाम आणि पाइपलाइनची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली जातात आणि ती वेळेतच होणे आवश्यक असते मात्र, सध्या बाजारपेठेत गेल्यावर पाइपचे दर ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.

जो ४ इंची पाइप पूर्वी १,३०० रुपयांना मिळत होता, तो आता थेट १,८२० रुपयांवर पोहोचला आहे. युद्धविराम न झाल्यास आणि कच्च्या मालाची टंचाई कायम राहिल्यास किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात पाइपलाइनची कामे मंदावलेली पाहायला मिळत आहेत.

PVC Pipe Price Hike
Ashok Kharat Nashik Case | भोंदू खरातच्या कार्यालयाची पुन्हा तपासणी

शेतीचे नियोजन विस्कळीत

वडेदारणा येथील प्रगतशील शेतकरी सागर सोनवणे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. दरवर्षी पाइपलाइनची देखभाल आणि नवीन कामे करणे गरजेचे असते, मात्र पाइपचे दर गगनाला भिडल्याने यंदा हे खर्च परवडणे अशक्य झाले आहे. खते, बियाणे आणि आता पाइपच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून किमती सातत्याने वाढत असल्यामुळे आम्हीही नवीन खरेदी मर्यादित केली आहे, केवळ अत्यावश्यक गरज असलेले शेतकरीच सध्या पाइप खरेदी करत आहेत.

- सुशील सोनवणे, पीव्हीसी पाइप वितरक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news