कदंब पठार येथील युनिटी मॉल प्रकल्पाला दिलेल्या पंचायत परवान्याला न्यायालयात आव्हान.
जिल्हा न्यायालयाने याचिकेतील दुरुस्तीला मंजुरी देत सुनावणी ९ जानेवारीपर्यंत तहकूब.
युनिटी मॉल प्रकल्पाच्या बांधकामावरील अंतरिम स्थगिती कायम.
गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरही कायदेशीर प्रश्नचिन्ह.
डिचोली : पुढारी वृत्तसेवा
सारमानस पिळगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी वेदांताची वाहतूक रोखून धरताना जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या पूर्ण होत नाही: तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत या भागातून ट्रक चालवता देणार नाही, असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी देताना गुरुवारी सकाळपासून खाण वाहतूक रोखून धरली आहे. गेल्या १९ महिने शेतकरी व ग्रामस्थ आपल्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
आतापर्यंत सुमारे २७ बैठका झाल्या आहेत. आश्वासने देऊन दिशाभूल करण्यात येत असल्याने आता आमचा तोल सुटलेला असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत खनिज वाहतूक सुरू करता येणार नाही, असा निर्धार ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला असून त्यामुळे या परिसरात लोकही आक्रमक झाले आहेत.
अॅड. अजय प्रभू गावकर यांनी सातत्याने यासंदर्भात गावाला न्याय मिळावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केलेले असून अद्याप आवश्यक तोडगा काढण्यात कंपनीने सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ युवा, तसेच आजारी रुग्ण शेतकरी यांनी एकत्र होऊन वाहतूक रोखली असून ते आपल्या मागण्यावर ठाम आहेत. पांडुरंग चव्हाण, विशाखा वळवेकर, सुधाकर वांगणकर व इतर ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापन व शासन व्यवस्थेच्या एकूण कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
आज बैठक; निर्णयाकडे लक्ष
दरम्यान, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी शुक्रवारी सकाळी यासंदर्भात तोडगा करण्यासाठी संयुक्त बैठक बोलावली असून त्या बैठकीत कोणता निर्णय होतो त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तोपर्यंत वाहतूक करता येणार नाही!
आमच्या शेतातून तुम्ही रस्ता काढला तसेच या ठिकाणी मोठा युनिट बसवला, अशी टीका ग्रामस्थांनी केली असून आता यापुढे जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वाहतूक करता येणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ
सरकारी अधिकारी, पोलिस यंत्रणेने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारीही चर्चेत गुंतलेले होते. दरम्यान, वेदांता सेसा गोवाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी पिळगावमधील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी सातत्याने संपर्क व संवाद साधत आहे. अनेक शेतकऱ्यांना सरकारी नियमाप्रमाणे मोबादला देण्यात आलेला आहे. काहीजणांनी तो स्वीकारला आहे. इतरांनीही तो घ्यावा, अशी विनंतीही आम्ही केलेली आहे.