Bicholim Cleanest City Goa 
गोवा

Bicholim Cleanest City Goa | साखळी नगरपालिकेने पटकावला गोवा राज्यातील 'प्रथम स्वच्छ शहर'चा बहुमान; राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Bicholim Cleanest City Goa | सलग तिसऱ्यांदा बहुमान; दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

साखळी (पुढारी वृत्तसेवा):

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयातर्फे देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात गोवा राज्यात साखळी नगरपालिकेने सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वच्छतेच्या क्षेत्रात आतापर्यंत या नगरपालिका तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत साखळी नगरपालिकेने गोव्यातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिल्ली येथील उद्योग भवनात दि. ११ रोजी आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरविकास खात्याचे सचिव यतीन मराळकर यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी साखळीच्या नगराध्यक्ष अंजना कामत, मुख्याधिकारी ईश्वर मडकईकर आणि उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर उपस्थित होते.

नगरसेवक आनंद काणेकर, ब्रह्मानंद देसाई, पालिका अभियंता प्रशांत नार्वेकर आणि पालिका बाजार निरीक्षक नारायण परब यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. गेल्या वर्षाभरापासून सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात साखळी नगरपालिकेने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

नवीन पालिका मंडळ स्थापन झाल्यानंतर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. माजी नगराध्यक्ष रश्मी देसाई यांच्या काळात साखळी पालिकेने स्वच्छतेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर गेल्या वर्षी माजी नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल साखळीला गोव्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले होते. यंदा पुरस्काराची परंपरा कायम राखत साखळी नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या पुरस्काराचे श्रेय माजी नगराध्यक्ष रश्मी देसाई आणि सिद्धी प्रभू यांच्याच्या कार्यकालतील प्रयत्नांसह सर्व सहकारी नगरसेवक आणि विशेषतः शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांना जाते.

स्वच्छता मोहिमेत नागरिकांनीही पालिकेच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे यश मिळाल्याचे नगराध्यक्ष अंजना कामत यांनी सांगितले. मुख्यमंत्री तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका विविध विकासकामे आणि स्वच्छता उपक्रम राबवत आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि सूचना प्रत्येक कामात उपयुक्त ठरत असल्याचेही अंजना कामत यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रींकडून कौतुक

दरम्यान, साखळी नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात सलगपणे पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी पालिका मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगारांचे अभिनंदन केले. स्वच्छ आणि सुंदर साखळी राखण्यासाठी नगरपालिका प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

पालिका आणि आपण वेळोवेळी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीची कुणाचीही जबाबदारी नसून, प्रत्येकाने ती पार पाडल्यास साखळी शहर आणि नगरपालिका क्षेत्र भविष्यातही स्वच्छ व सुंदर राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT