१९८०पासून पाणवठा आधारित प्राणी गणनेची पद्धत सुरू झाली आहे.  (Canva Photo)
गोवा

Wildlife Census 2026 | सह्याद्री व्याघ्रसह 3 अभयारण्यांत 1,556 वन्यजीवांची नोंद

Wildlife Census 2026 | सह्याद्री व्याघ्र राखीव, राधानगरी व सागरेश्वर अभयारण्यातील 'निसर्गानुभव'ला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

वारणावती: आष्पाक आत्तार

सह्याद्री व्याघ्र राखीव, राधानगरी वन्यजीव अभयारण्य व सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणस्थळांवरील प्राणी पाहणी 'निसर्गानुभव' कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १ मे रोजी पार पडलेल्या या उपक्रमात एकूण १,५५६ वन्य प्राणी, पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांची महत्वपूर्ण नोंद करण्यात आली.

दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश अधिक असल्याने वन्यजीव पाणवठ्यांवर येण्याचे प्रमाण वाढते. याच पार्श्वभूमीवर हा विशेष उपक्रम आयोजित केला जातो. क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. तीनही अभयारण्यांतील एकूण १३४ मचाणांवर १७५ वनकर्मचारी आणि २२८ निसर्गप्रेमींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यंदाच्या पाहणीत मांसाहारी प्राण्यांमध्ये ५ बिबट्यांच्या अप्रत्यक्ष खुणा आढळून आल्या.

तसेच २४० सांबर, १६५ चितळ, ३२ अस्वल, २३ भेकर, १८ मुंगूस, २१ रानकुत्रे, ७ उदमांजर, २३ शेकरू, १ कोल्हा, ३ रानमांजर, १८ रानडुक्कर, २७ ससे, २४७ रानगवे, ७१ रानम्हैस, ६१ माकडे, १८ साळींदर, १ तरस, १ उंदीर व ४ पिसोरी यांची नोंद करण्यात आली. पक्षी निरीक्षणामध्ये ४ हरियाल पक्षी, ३ नाईट जार, २ खंड्या पक्षी, २ घार, २ कोकिळा, १ पांढऱ्या गालाचा बार्बेट, १ मलबार शिटेबाज श्रश, १ मोठा बुलबुल,

१ आशियाई परिनिळा पक्षी, १४ होला, १२ रेड व्हेंटेड बुलबुल, २ पिवळा पक्षी, १०८ रानकोंबडे, ७ धनेश, १ ब्राह्मणी घार, २ भारतीय सीमेटर बॉबलर, १ बुलबुल, १ तांबड्या पाठीचा सूर्यपक्षी, १ शिपाई बुलबुल, १ सातभाई, १ पांढरे राखाडी घुबड, ४ पोपट, ६८ मोर, ६ घुबड व १ पारवा यांची महत्वपूर्ण नोंद घेण्यात आली.

सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये २ धामण, २नाग, २घोणस, १ अजगर, १ सरडा व १० घोरपड आढळून आल्या. याशिवाय जवळपास १०० फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद निसर्गप्रेमींनी केली. वन विभागाच्या या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन, वन्यजीवांची संख्या आणि त्यांच्या अधिवासाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT