पणजी: पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे नेते सचिन पायलट. सोबत युरी आलेमाव, माणिकराव ठाकरे, विरिएतो फर्नाडिस व इतर काँग्रेस नेते. 
गोवा

Sachin Pilot vote ban allegation | नोट बंदीनंतर आता वोट बंदी

सचिन पायलट यांचा आरोप : मतदारांची नावे वगळणे बेकायदेशीर.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या आदेशानुसार देशभरातील करोडो लोकांची नावे एसआयआरच्या माध्यमातून मतदार याद्यातून वगळली. हे सारे कृत्ये बेकायदेशीर आहे. केंद्राने अगोदर नोट बंदी लादली आणि त्यानंतर आता वोट बंदी लादली गेली आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला.

पणजी येथे काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेसचे आमदार व इतर नेते उपस्थित होते.

पायलट म्हणाले की, पात्र मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित केले गेले आहे. काँग्रेस हे सारे करणार नाही आणि त्यासाठी एसआयआरच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. गोव्यात काँग्रेसने सुरू केलेल्या गोवा राखण यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीनंतर निश्चितपणे काँग्रेसला गोव्यात बहुमत मिळेल.

काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा पायलट यांनी यावेळी केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. लोक सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे पर्यायी सरकार म्हणून काँग्रेसकडे लोक पाहात आहेत, असे सांगून साखळीत गोवा राखण यात्रेला लोकांनी येऊ नये यासाठी मुख्यमंत्री आडकाठी आणत असल्याचा दावा पायलट यांनी केला.

चलाख पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे चलाख नेते म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी आज पणजीत अशीच चलाखी दाखवली. एका बाजूला काँग्रेस देशभर एसआयआरच्या विरोधात आंदोलन करत असताना केरळचे गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला तेथील इतर काही काँग्रेसच्या नेत्यांनी एसआयआर चांगला आहे. त्यामुळेच केरळमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्याचे सांगितले आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत.

याबाबत पायलट यांना पत्रकारांनी विचारले असता ते व्हिडिओ पाहिले नाहीत, पाहिल्यानंतर आपण त्यावर बोलू म्हटले. याच व्हिडिओवर दिल्लीत पत्रकारांनी काँग्रेसच्या नेत्याना प्रश्न केले होते. त्यांनी पाहिले नाही म्हणत जशी वेळ मारुन नेली होती तशीच आज पायलट यांनी म्हटले व वेळ मारून नेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT