goa assembly winter session  Pudhari
गोवा

Goa Assembly Election | वाढत्या इच्छुकांमुळे विद्यमान आमदार अस्वस्थ; गोव्यात भाजपकडून 7 आमदारांची उमेदवारी धोक्यात?"

Goa Assembly Election | अनेकांकडून मतदारसंघात कामाला सुरुवात : सामाजिक कामे, स्पर्धांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

राज्यामध्ये २०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेत येणार असा विश्वास भाजपच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही वाटत आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक नेते आतापासूनच प्रयत्न करत आहेत. मतदारसंघात सामाजिक कामे करत आहेत.

स्पर्धा आयोजित करत आहेत. ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तिथेही अनेक इच्छुक उमेदवार तयारी करत आहेत. इच्छुक उमेदवार सर्वच स्तरांवर सक्षम असल्याने पक्ष आपली उमेदवारी कापून इच्छुकाला तर देणार नाही, या प्रश्नाने विद्यमान आमदारांची अस्वस्थता वाढली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जे आमदार लोकांच्या संपर्कात नाहीत, पक्ष कार्य करत नाहीत, त्यांची उमेदवारी कापली जाईल, असे जाहीर केले आहे. आमदारांच्या कामाचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल केंद्रीय पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे.

येत्या निवडणुकीत किमान पाच ते सात आमदारांची उमेदवारी धोक्यात आहे, असे नाईक यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळेच अनेक इच्छुकांना वाटते की आपल्या पसंतीच्या मतदारसंघातील आमदाराची उमेदवारी कापून आपल्याला ती मिळू शकते. त्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

पणजीचे विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी कापली जाणार नसली तरी त्यांना सांताक्रुझमध्ये हलवून पणजीतून माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उतरवले जाण्याची शक्यता असल्याने कुंकळ्येकर व उत्पल पर्रीकर दोघेही तयारीला लागले आहेत.

पणजीजवळच्या सांताक्रुझमध्ये बाबूश मोन्सेरात यांनी कार्यालय सुरू केल्यामुळे विद्यमान भाजप आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांची उमेदवारी जाणार असे संकेत मिळत आहेत. बाबूश यांच्या सांताक्रुझमधील एन्ट्रीने दुसरे इच्छुक माजी जि. पं. सदस्य गिरीश उसकईकर अडचणीत आले आहेत. पेडणे, म्हापसा, कुंभारजुवे, शिवोली, सावर्डे, मये, थिवी येथे अनेक नवे इच्छुक उमेदवार तयार झाले आहेत.

विद्यमान आमदार व दमदार इच्छुक तालिका

मतदारसंघविद्यमान आमदारदमदार इच्छुककुंभारजुवेराजेश फळदेसाईसिद्धेश नाईक (जि. पं. सदस्य)म्हापसाजोशुआ डिसोझा (उपसभापती)रुपेश कामत व मयूर सावकारशिवोलीदिलायला लोबोदयानंद मांद्रेकर (माजी मंत्री)थिवीनीळकंठ हळर्णकर (मंत्री)सदानंद शेट तानावडे (खासदार), किरण कांदोळकर (माजी आमदार)पेडणेप्रवीण आर्लेकरबाबू आजगावकर (माजी उपमुख्यमंत्री), डॉ. संजय कोरगावकरमयेप्रेमेंद्र शेटप्रा. सुलक्षणा सावंत (मुख्यमंत्र्यांच्या पत्नी), दयानंद कारबोटकर (उ. गो. अध्यक्ष)सावर्डेडॉ. गणेश गावकर (सभापती)विनय तेंडुलकर (माजी मंत्री) व संकेत आर्सेकर (युवा नेते)कुडचडेनीलेश काब्रालरोहन गावस-देसाई

मांद्रे, प्रियोळ, फोंडा मतदारसंघात काय होणार?

मांद्रे मतदारसंघात मगोचे जीत आरोलकर आमदार आहेत. भाजप- मगो युती होऊन पुन्हा त्यांना मगोतर्फे संधी मिळते की भाजपात दाखल होतात हे पहावे लागेल. आरोलकर यांना पुन्हा संधी मिळाली तर इच्छुक माजी आमदार दयानंद सोपटे यांचे काय, हा प्रश्न आहे.

तसेच प्रियोळमध्ये भाजप- मगो युती कायम राहिल्यास आमदार गोविंद गावडे हेच उमेदवार असतील की मगोला हा मतदारसंघ सोडला जाईल हे स्पष्ट व्हायचे आहे, तर मगो - भाजप युती तुलल्यास किंवा युती राहिली आणि फोंडा मगोला दिल्यास फोंड्यात मंत्री सुदिन ढवळीकर हे उभे राहतील. मग पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर झालेले रितेश रवी नाईक यांचे काय हा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT