Atal Setu Panaji | पणजीत अटल सेतूखाली वाहतुकीची कोंडी file photo
गोवा

Atal Setu Porvorim Flyover | अटल सेतू आणि पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक सुरक्षेचे प्रश्न तातडीने सोडवा; पर्यटनमंत्री रोहन खंवटे

Atal Setu Porvorim Flyover | पर्यटनमंत्री रोहन खंवटे : प्रवेश-निर्गमन व्यवस्था सुधारण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यांवरील प्रवेश-निर्गमन व्यवस्थेमुळे वाहतुकीचा गोंधळ निर्माण होत असल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अटल सेतू आणि पर्वरी येथील सहापदरी उन्नत मार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

अटल सेतू आणि पर्वरीतील सहापदरी उन्नत मार्गामुळे वाहतुकीला चालना मिळाली असली, तरी या मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील प्रवेश-निर्गमन व्यवस्था, वाहतूक नियमन आणि रस्ता सुरक्षेबाबत काही ठिकाणी समस्या निर्माण होत असल्याचे खंवटे यांनी निदर्शनास आणले.

या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन यंत्रणांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी अटल सेतूवर जाण्यासाठी आणि तेथून बाहेर पडण्यासाठी योग्य प्रवेश व निर्गमन बिंदू विकसित करावेत.

वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पर्वरी परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. वाहनचालकांना रस्त्याची स्थिती आणि संभाव्य धोक्यांची माहिती मिळावी यासाठी इशारा व दिशादर्शक फलक लावावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा मजबूत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित देखरेख यंत्रणा तसेच वेग मोजणारे कॅमेरे बसविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT