Doctors Pudhari
गोवा

Goa Raid on Illegal Ayurvedic Hospital Porvorim | पर्वरीतील बेकायदेशीर आयुर्वेदिक रुग्णालयावर छापा

पर्वरीतील बेकायदेशीर आयुर्वेदिक रुग्णालयावर छापा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पर्वरी येथे थाताना हॅट नावाचे आयुर्वेद रुग्णालय आणि पंचकर्म केंद्र गेली काही वर्षे अनिवार्य असे वैधानिक परवाने न घेता कार्यरत असल्याचे कळताच छापा टाकण्यात आला. गोवा आयुर्वेदिक आणि इतर संलग्न भारतीय वैद्यक प्रणाली परिषदेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर एफडीए व संलग्न खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकला. यावेळी गोवा आयुर्वेदिक आणि इतर संलग्न भारतीय वैद्यक प्रणाली परिषदेच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत उपस्थित होत्या.

त्यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, दोन स्थानिक डॉक्टर वगळता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी असलेले इतर डॉक्टर्स गोवा आयुर्वेदिक परिषदेकडे नोंदणीकृत नव्हते. डॉ. भागवत यांनी उत्तर गोवा एसपी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली असून, रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची आणि सर्व आवश्यक परवाने, नोंदणी आणि वैधानिक परवानग्या मिळेपर्यंत त्याचे कामकाज निलंबित करण्याची मागणी केली आहे.

त्या आस्थापनात पंचकर्म आणि निसर्गोपचार तसेच औषधोपचार केले जात असल्याचेही आढळून आले. औषधनिर्माण परवाना नसताना ही संस्था पंचकर्म उपचार व औषधे वितरित करत असल्याचे आढळून आले. तसेच, त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांकडे वैध आरोग्य कार्डही नव्हते, असे डॉ. स्नेहा भगवत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT