Siridao Resort Scam  File Photo
गोवा

Siridao Resort Scam | जादा नफ्याचे आमिष दाखवून 50.61 लाखांना गंडा

Siridao Resort Scam | आपल्या रिसॉर्ट व्यवसाय उपक्रमात गुंतवणूक केल्यास ४० टक्के नफा मिळवून देऊ, असे आश्वासन देऊन शिरदोण येथील दोघांनी पुणे येथील एकाला ५०.६१ लाख रुपयांचा गंडा घातला.

पुढारी वृत्तसेवा

पणजी: पुढारी वृत्तसेवा

आपल्या रिसॉर्ट व्यवसाय उपक्रमात गुंतवणूक केल्यास ४० टक्के नफा मिळवून देऊ, असे आश्वासन देऊन शिरदोण येथील दोघांनी पुणे येथील एकाला ५०.६१ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अश्विन अरुण अडसूळ (रा. अष्टिका हाऊस, ढोले पाटील रोड, पुणे) यांनी आगशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

यावरून पोलिसांनी सोनईल सराफ आणि कृष्णा सराफ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन्ही संशयितांना भारतीय न्याय संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संशयितांनी 'सोनहे गॅस्ट्रोपब द सी (रिसॉर्ट), शिरदोण, गोवा' या व्यवसाय उपक्रमाचे मालक म्हणून तक्रारदाराला या व्यवसाय उपक्रमात एकूण ५८,११,००० रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले.

तक्रारदाराला या उपक्रमात ४० टक्के नफा मिळेल असे आश्वासन दोघांनी दिले होते. तथापि, संशयित तक्रारदाराला नफ्याचा मान्य केलेला वाटा देण्यात अयशस्वी ठरले व विश्वासघात केला.

संशयितांनी गुंतवणुकीच्या रकमेतून फक्त ७ लाख ५० हजार रुपये परत केले आणि उर्वरित गुंतवलेली ५० लाख ६१ हजार रुपये परत करण्यात ते अयशस्वी ठरले व तक्रारदाराची फसवणूक केली. त्यामुळे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिस उपनिरीक्षक दीपिका परवार पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT