Panjim Casino | 
गोवा

Panjim Casino | मांडवीतील नव्या 'महाकाय' कॅसिनोला पणजीकरांचा कडाकड विरोध; महापालिकेत नागरिकांचा ठिय्या

Panjim Casino | पणजी महापालिकेची बैठक रद्द झाल्याने गोंधळ; वाल्मिकी नाईक यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी हटवले

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मांडवी नदीतील नव्या कॅसिनो जहाजाविरोधात ठराव घेण्यासाठी गुरुवारी होणारी पणजी महापालिकेची बैठक झालीच नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आपचे प्रदेशाध्य वाल्मिकी नाईक यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांना उचलून सभागृहाच्या बाहेर नेले.

सुमारे दोन तासांनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी पद्मश्री लिबिया लोबो सरदेसाई, सबिना मार्टिन यांच्यासह पणजीतील अन्य नागरिक उपस्थित होते. वाल्मिकी नाईक म्हणाले की, महापौर रोहित मोन्सेरात यांनी कॅसिनो विषयाबाबत १२ फेब्रुवारी रोजी बैठक घेणार असल्याचे सांगितले होते.

त्यामुळे आम्ही सकाळी ११ वाजता येथे आलो होतो. मात्र आम्ही येथे आल्यावर अशी बैठक नसल्याचे समजले. आम्ही येथेच बसण्याचा निर्णय घेतल्यावर पोलिस बळाचा वापर करून बाहेर काढण्यात आले.

बैठक होणारच नव्हती तर महापौरांनी आम्हाला खोटे आश्वासन का दिले, त्यांच्यावर, पोलीसांवर कुणाचा दबाव आहे का याची उत्तरे आम्हाला मिळाली पाहिजेत. ते म्हणाले, सरकार मांडवीतील जुने जहाज जाऊन तिथे नवीन जहाज येणार असल्याचे सांगते.

मात्र, नवीन जहाज ११२ मीटर लांब आणि २७मीटर उंच आहे. हे जहाज जवळपास ९ मजली इमारती एवढे उंच आहे. जहाजाची क्षमता देखील पाच पटीने वाढली आहे. या जहाजाला मार्ग करून देण्यासाठी दोन कॅसिनोंना हलवावे लागले. मोठ्या कॅसिनोमुळे पणजीतील समस्या देखील वाढणार आहेत.

पणजीकरांसाठी हा खूप मोठा विषय आहे. यावर नगरसेवकांनी चर्चा करणे आवश्यक आहे. आज झालेल्या प्रकाराबद्दल महापौरांना पत्र लिहिले असून आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत.

लढा सुरुच राहणार : लिबिया लोबो लिबिया लोवो सरदेसाई म्हणाल्या की, मांडवीतील कॅसिनोला आमचा विरोध आहे. आम्हाला चांगले मासे खायचे आहेत. मांडवीत कॅसिनो येऊ नये, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT