गोवा

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तीन दिवसांचा गोवा दौरा: हुतात्म्यांना केले अभिवादन

अविनाश सुतार

पणजी: पुढारी वृत्तसेवा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज (दि.२२) तीन दिवसांच्या भेटीसाठी गोव्यामध्ये आगमन झाले. राष्ट्रपतींनी पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला भेट दिली आणि हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, पणजीचे आमदार व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात आदी उपस्थित होते. (Droupadi Murmu)

राष्ट्रपतींच्या गोव्यातील दौऱ्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अनेक रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. आझाद मैदान हे पणजीच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. राष्ट्रपतींचे आझाद मैदानावर आगमन होताच त्यांनी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलिसानी मानवंदना दिल्यानंतर पोलीस बँडकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रवाना झाल्या.(Droupadi Murmu)

आज संध्याकाळी राष्ट्रपतींचा नागरी सत्कार दोनापावला येथील राजभवनावर होणार आहे . तर उद्या सकाळी गोवा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती गोवा विधानसभेमध्ये आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर गोव्यातील मंदिरांना भेटी देऊन राष्ट्रपती गुरूवारी (दि.२४) दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT