गोवा, पुढारी वृत्तसेवा : गोवा -रामनगर राष्ट्रीय महामार्गवरील हार्ली क्रॉसजवळ बोलेरो पिकअप आणि कार यांच्यात शुक्रवारी पहाटे धडक झाली. या अपघातात गोव्यातील पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बॉयलर कोंबड्या घेऊन कर्नाटकातून गोव्यात जाणारा बोलेरो पिकअप (GA 08 V 7274 ) आणि गोव्यातून कर्नाटकात जाणारी कार (GA 03 Y 6863) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यामध्ये कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. तर जखमीत दोन महिलांचा समावेश आहे. अपघातनंतर स्थानिकांनी जखमींना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल केले.
.हेही वाचा